रवी जाधवच्या सिनेमात बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची वर्णी, म्हणाली - ताली बजाऊंगी नहीं, बजवाऊंगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 12:12 IST2022-10-08T12:11:52+5:302022-10-08T12:12:20+5:30

Ravi Jadhav: प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव ट्रान्सजेंडर गौरी सावंत यांच्या जीवनावर वेबसीरिज बनवत आहेत. त्यात बॉलिवूड अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

This Bollywood actress' character in Ravi Jadhav's movie, said - Tali Bajaungi Nahin, Bajwaungi! | रवी जाधवच्या सिनेमात बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची वर्णी, म्हणाली - ताली बजाऊंगी नहीं, बजवाऊंगी!

रवी जाधवच्या सिनेमात बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची वर्णी, म्हणाली - ताली बजाऊंगी नहीं, बजवाऊंगी!

सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर होती. पण ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यानंतर तिच्या कारकिर्दीला नवी भरारी मिळाली आहे. सुष्मिता सेनने आर्या सीरिजमधून पुनरागमन केले. ही मालिका सुपरहिट ठरली. इतकेच नाही तर त्याचा दुसरा सीझनही सुपर डुपर हिट ठरला. आर्याच्या यशानंतर सुष्मिता आता नवीन वेबसीरिज घेऊन येत आहे. नवीन वेब सीरिजमध्ये सुष्मिता एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित ताली (Taali) या सीरिजमध्ये ती पाहायला मिळणार आहे.

सुष्मिता सेन पुन्हा एकदा ओटीटीवर तिचा हटके अवतार दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्रीने नवीन वेब शोचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या मालिकेत सुष्मिता सेन ट्रान्सजेंडर गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टर शेअर करताना सुष्मिताने लिहिले की, मला एका सुंदर व्यक्तीचे जीवन चित्रित करण्याची संधी मिळाली. यापेक्षा भाग्यवान काहीही असू शकत नाही.

सीरिजचे पोस्टर शेअर करत सुष्मिताने कॅप्शनमध्ये लिहिले, ताली बजाऊंगी नहीं, बजवाऊंगी! फोटोमध्ये सुष्मिता हटके अंदाजात दिसत आहे. साडी, कपाळावर लाल रंगाची मोठी बिंदी आणि गळ्यात माळ घातलेली सुष्मिता कडक लूकमध्ये दिसत आहे. ती व्यक्तिरेखेत किती समरुप झालीय हे तिला पाहूनच कळते. आतापर्यंत सुष्मिताच्या या भूमिकेची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे तिचे चाहते ही सीरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

ट्रान्सजेंडर गौरी सावंत या एक कार्यकर्त्या आहेत, ज्या विक्सच्या जाहिरातीत झळकल्या होत्या. या जाहिरातीत त्या एका लहान मुलीसोबत दिसल्या होत्या. गौरी यांच्या या जाहिरातीची बरीच चर्चा झाली होती. गौरी सावंत अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्येही त्यांच्या उत्कृष्ट कर्तृत्वामुळे दिसली आहे. गौरी सावंत यांच्या बायोपिकची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. अखेर ही सीरिज लवकरच भेटीला येत आहे.  

Web Title: This Bollywood actress' character in Ravi Jadhav's movie, said - Tali Bajaungi Nahin, Bajwaungi!