भाग्यश्री नव्हे तर 'मैंने प्यार किया'साठी ही अभिनेत्री होती पहिली पसंती, या कारणामुळे झाली रिजेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:07 IST2025-01-03T11:06:38+5:302025-01-03T11:07:23+5:30
Maine Pyar Kiya Movie : १९८९ साली भाग्यश्रीने सूरज बडजात्याच्या मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट तिच्या करिअरसाठी वरदान ठरला. या चित्रपटात भाग्यश्री सोबत सलमान खान होता. मात्र सलमानमुळे एका अभिनेत्रीला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

भाग्यश्री नव्हे तर 'मैंने प्यार किया'साठी ही अभिनेत्री होती पहिली पसंती, या कारणामुळे झाली रिजेक्ट
१९८९ साली भाग्यश्री(Bhagyashree)ने सूरज बडजात्या(Suraj Barjatya)च्या 'मैने प्यार किया' (Maine Pyar Kiya) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट तिच्या करिअरसाठी वरदान ठरला. या चित्रपटात भाग्यश्री सोबत सलमान खान (Salman Khan) होता. मात्र सलमानमुळे एका अभिनेत्रीला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या चित्रपटासाठी तिचीही निवड झाल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे.
मैने प्यार किया हा चित्रपट त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर हिट ठरला. या चित्रपटात भाग्यश्रीने सलमान खानपेक्षा तिप्पट मानधन घेतले होती. या चित्रपटासाठी भाग्यश्रीला एक लाख रुपये फी देण्यात आली होती. तर सलमान खानला ३० हजार रुपये मानधन मिळाले होते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटासाठी भाग्यश्री पहिली पसंती नव्हती. 'मैने प्यार किया' या चित्रपटातून सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री भाग्यश्रीची जागा 'द कपिल शर्मा शो'मध्ये मावशीची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली उपासना सिंग घेणार होती. हे फार कमी लोकांना माहीत असेल. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे.
या कारणामुळे झाली भाग्यश्रीची निवड
सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत खुद्द उपासनाने खुलासा केला की, तिने भाग्यश्रीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. याबाबत सूरज बडजात्या यांच्याशी चर्चाही झाली होती. या भूमिकेसाठी माझी निवड झाली. पण दुसऱ्या दिवशी मला फोन करून त्यांच्या वडिलांशी ओळख करून दिली. त्यांनी मला नाकारले. आपला मुद्दा पुढे करत अभिनेत्री म्हणाली की, त्यावेळी मी सलमानपेक्षा खूप उंच दिसत होते आणि त्यांना त्याच्यापेक्षा लहान मुलगी हवी होती. मला सांगण्यात आले की ते खूप गोड लोक आहेत, म्हणून त्यांनी मला स्पष्ट केले नाही की त्यांनी मला रिजेक्ट केले आहे, परंतु त्यांनी मला पुन्हा हा चित्रपट येण्यासाठी बोलावले नाही. मैने प्यार किया या चित्रपटात माझी वर्णी लागता लागता राहिली.
या मुलाखतीत उपासनाने हे देखील सांगितले की, बऱ्याच काळानंतर राजश्री प्रॉडक्शनसोबत मी प्रेम की दिवानी हूं या चित्रपटात काम केले होते, त्यावेळी त्यांनी सुमनच्या भूमिकेसाठी पहिली पसंती होते, असे सर्व कलाकारांसमोर जाहीर केले होते. या चित्रपटामुळे भाग्यश्री रातोरात स्टार बनली. हा चित्रपट इतका गाजला की या एका चित्रपटानंतर अभिनेत्री निर्मात्यांची पहिली पसंती बनली. जर उपासनाला हा चित्रपट मिळाला असता तर कदाचित आज तिची कारकीर्द वेगळ्या दिशेने गेली असती.