बॉयफ्रेंडमुळे या अभिनेत्रीनं नाकारला ब्लॉकबस्टर सिनेमा 'आशिकी', अनु अग्रवालनं दिला होकार अन् रातोरात झाली स्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 14:21 IST2023-07-01T14:19:59+5:302023-07-01T14:21:05+5:30

Aashiqui : 'आशिकी' चित्रपटानंतर, अनु अग्रवाल एक मोठी स्टार म्हणून उदयास आली, परंतु फार कमी लोकांना माहित आहे की या चित्रपटासाठी अनु ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. यापूर्वी हा चित्रपट एका प्रसिद्ध अभिनेत्रीला ऑफर करण्यात आला होता.

This actress turned down the blockbuster movie 'Aashiqui' because of her boyfriend, Anu Aggarwal agreed and became a star overnight. | बॉयफ्रेंडमुळे या अभिनेत्रीनं नाकारला ब्लॉकबस्टर सिनेमा 'आशिकी', अनु अग्रवालनं दिला होकार अन् रातोरात झाली स्टार

बॉयफ्रेंडमुळे या अभिनेत्रीनं नाकारला ब्लॉकबस्टर सिनेमा 'आशिकी', अनु अग्रवालनं दिला होकार अन् रातोरात झाली स्टार

१९९० मध्ये आलेला महेश भट (Mahesh Bhatt) यांचा 'आशिकी' (Aashiqui) हा चित्रपट आजही सर्वांच्या मनात घर करून कायम आहे. राहुल रॉय (Rahul Roy) आणि अनु अग्रवाल (Anu Aggarwal) यांचा अभिनय इतका आवडला की हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्यातील प्रत्येक गाणे सुपर-डुपर हिट ठरले. या चित्रपटाच्या यशाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की यानंतर राहुल रॉयला बॅक टू बॅक ६० चित्रपटांच्या ऑफर आल्या आणि अनु अग्रवाल एक मोठी स्टार म्हणून पुढे आली, परंतु फार कमी लोकांना माहित आहे की या चित्रपटासाठी अनु ही पहिली निवड नव्हती. ओटीटीवर चालणाऱ्या बिग बॉसच्या एका स्पर्धकाने हा खुलासा केला आहे. तिने सांगितले की 'आशिकी'मधील मुख्य भूमिकेसाठी तिची निवड झाली होती, परंतु तिने आपल्या प्रियकरासाठी हा चित्रपट सोडला.

आम्ही बोलत आहोत, बॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शिक महेश भट यांची लेक पूजा भट. 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये पूजा एक स्पर्धक म्हणून दिसते आहे. शो दरम्यान तिने स्वतःबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. 'बिग बॉस'च्या घरात घरातील सदस्यांशी संवाद साधताना पूजाने सांगितले की, अनु अग्रवालच्या आधी चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'आशिकी' या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी तिच्याशी संपर्क साधला होता, पण तिच्या प्रियकरामुळे तिने हा चित्रपट नाकारला होता. त्यानंतर पूजा ज्याच्यासोबत होती. तो तिच्याशी लग्न करण्यास तयार नव्हता.

पूजा भटची एकेकाळी इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये होती गणना
पूजा भटचा पहिला चित्रपट 'डॅडी' होता. हा चित्रपट तिचे वडील महेश भट यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर 'दिल है की मानता नहीं' आणि 'सडक' यांसारख्या सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली. त्या काळात तिची इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये गणना होते. मात्र, तिच्या बॉयफ्रेंडमुळे तिची कारकीर्द थोडी ढासळली आणि नंतर दोघे वेगळे झाले. पूजा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामुळे अनेकदा चर्चेत असते.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: This actress turned down the blockbuster movie 'Aashiqui' because of her boyfriend, Anu Aggarwal agreed and became a star overnight.