'सिकंदर'मध्ये रश्मिका मंदानावर वरचढ ठरली ही अभिनेत्री, ती आहे अभिनेत्याची पुतणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:31 IST2025-04-01T11:30:16+5:302025-04-01T11:31:06+5:30

Sikandar Movie : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. एआर मुरुगादास दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

This actress outshined Rashmika Mandanna in 'Sikandar', she is the actor's niece | 'सिकंदर'मध्ये रश्मिका मंदानावर वरचढ ठरली ही अभिनेत्री, ती आहे अभिनेत्याची पुतणी

'सिकंदर'मध्ये रश्मिका मंदानावर वरचढ ठरली ही अभिनेत्री, ती आहे अभिनेत्याची पुतणी

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान(Salman Khan)चा सिकंदर (Sikandar Movie) हा चित्रपट प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. एआर मुरुगादास दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, भाईजानने एक कौटुंबिक चित्रपट बनवला आहे, जो कुटुंबासोबत बसून पाहता येईल. दुसरीकडे, समीक्षकांनी चित्रपटाला टॉर्चर म्हणत त्याच्या कथेवर प्रश्न उपस्थित केले आहे. तर, चित्रपटातील काही पात्रांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये एका अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश आहे, जी मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna)पेक्षाही जास्त चर्चेत आहे.

सिकंदर या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय एका अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, तिचे नाव आहे अंजिनी धवन. अंजनीने अलिकडेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ही अभिनेत्री चर्चेत आहे कारण तिला तिच्या दुसऱ्याच चित्रपटात सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. अंजिनी निशाच्या भूमिकेत तर सुपरस्टार संजय कपूर तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटात अंजनीचे पात्र थोडे उशिरा दाखवले आहे, पण तिने तिची भूमिका चोख बजावली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर लोकांमध्ये अंजनीच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. लोक गुगलवर तिच्याबद्दल माहिती शोधत आहेत.

अंजिनी धवन ही वरुण धवनची आहे पुतणी
अभिनेत्री अंजिनी धवनची आणखी एक ओळख म्हणजे ती बॉलिवूड अभिनेता वरुण धवनची पुतणी आहे. सिकंदर या चित्रपटातील तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. चित्रपट समीक्षकांनीही तिच्या कामाचे कौतुक केले आहे.

'सिकंदर'ची कथा
राजकोटच्या राजा उर्फ ​​संजयची म्हणजेच सलमान खानची कथा सिकंदर चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला तो राजकारण्याचा मुलगा अर्जुन (प्रतिक बब्बर) याला फ्लाइटमध्ये मारहाण करतो. यानंतर मंत्र्यांचे गुंड संजयच्या मागे लागतात. या भांडणामुळे सिकंदर आपली पत्नी साईश्रीला गमावतो. रश्मिकाने मृत्यूपूर्वीच तिचे अवयव दान केले होते. त्यामुळे तिघांचे प्राण वाचले आहेत. कथेत एक मोठा ट्विस्ट आहे, जेव्हा सलमान त्या तिघांना वाचवण्यासाठी आणि पत्नीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी राजकोटहून मुंबईला पोहोचतो. यानंतर मंत्री आणि त्यांचे गुंड तिघांच्याही जीवावर बेततात.

Web Title: This actress outshined Rashmika Mandanna in 'Sikandar', she is the actor's niece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.