'मनं जुळली, लग्नाची बोलणीही झाली, पण..'; करिश्माच्या आईमुळे मोडलं अक्षय खन्नाचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:11 AM2024-03-28T11:11:42+5:302024-03-28T11:12:29+5:30

Akshaye Khanna: जाणून घ्या, नेमकं करिश्माच्या आईमुळे कसं मोडलं अक्षयचं लग्न

this-actor-was-going-to-marry-karisma-kapoor-but-today-remained-single | 'मनं जुळली, लग्नाची बोलणीही झाली, पण..'; करिश्माच्या आईमुळे मोडलं अक्षय खन्नाचं लग्न

'मनं जुळली, लग्नाची बोलणीही झाली, पण..'; करिश्माच्या आईमुळे मोडलं अक्षय खन्नाचं लग्न

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांच्या यादीत एकेकाळी अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) याचं नाव आवर्जुन घेतलं जायचं. करिअरच्या सुरुवातीलाच अक्षयने काही सुपरहिट सिनेमा दिले. ज्यामुळे तो अनेक तरुणींचं क्रश झाला होता. मात्र, काही मोजके ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्यानंतर अक्षयच्या करिअरला उतरती कळा लागली. इतंकच नाही तर एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याने आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच सध्या तो काय करतो, त्याच्या जीवनात काय सुरु आहे, त्याच्या करिअरविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम प्रयत्न करत असतात.

या सिनेमातून मिळाली खरी ओळख

बॉलिवूडच्या इतिहासात गाजलेला बॉर्डर हा सिनेमा साऱ्यांनाच ठावूक आहे. मल्टीस्टारर असलेल्या या सिनेमात उत्तम अभिनय करत अक्षयने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. या सिनेमासाठी त्याला पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर हमराज या सिनेमात खलनायकाची भूमिकाही त्याची विशेष गाजली.

करिश्मा कपूरसोबत मोडलं लग्न?

अक्षय खन्ना त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही बऱ्याचदा चर्चेत राहिला. अक्षयचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. यात करिश्मा कपूर आणि त्याच्या नात्याची बरीच चर्चा रंगली. करिश्मासोबत लग्न करावं अशी अक्षयची प्रचंड इच्छा होती. याविषयी रणधीर कपूर आणि विनोद खन्ना यांनी लग्नाची बोलणीदेखील केली होती. मात्र, करिश्माची आई बबिता यांना हे नातं मान्य नव्हतं. करिश्माच्या तुलनेत अक्षयने करिअरमध्ये फारशी प्रगती केली नव्हती हे कारण देत त्यांनी या लग्नाला नकार दिला होता. त्यानंतर अक्षयने कोणासोबतही लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

सध्या काय करतोय अक्षय खन्ना

अक्षयचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा प्रचंड कमी झाला आहे. मात्र, एखाद वेळेस तो एखाद्या वेबसीरिजमध्ये वा सिनेमामध्ये कॅमियो रोलमध्ये दिसून येतो. 'दृश्यम 2' मध्ये तो मध्यंतरी दिसून आला होता. त्यानंतर लवकरच तो एका वेबसीरिजमध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: this-actor-was-going-to-marry-karisma-kapoor-but-today-remained-single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.