तेरा वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत रोमान्स करणे रविना टंडनला पडले महागात, वाचा आता काय घडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 21:57 IST2017-09-28T16:27:17+5:302017-09-28T21:57:59+5:30
अभिनेत्री रविना टंडन हिचा ‘शब’ हा बोल्ड चित्रपट याचवर्षी १४ जुलै रोजी रिलीज झाला. चित्रपटात आपल्या वयापेक्षा तेरा वर्षांनी ...

तेरा वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत रोमान्स करणे रविना टंडनला पडले महागात, वाचा आता काय घडले!
अ िनेत्री रविना टंडन हिचा ‘शब’ हा बोल्ड चित्रपट याचवर्षी १४ जुलै रोजी रिलीज झाला. चित्रपटात आपल्या वयापेक्षा तेरा वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स करूनही रविनाच्या या चित्रपटाला म्हणावे तेवढे यश मिळाले नाही. आता पुन्हा एकदा या चित्रपटाला एक झटका बसला असून, सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला टीव्हीवर टेलिकास्ट करण्यावर बंदी आणली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या मते, चित्रपटात प्रमाणापेक्षा अधिक एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर्स आणि होमोसेक्शुअॅलिटीला दाखविण्यात आले आहे. त्यामुळे सेन्सॉरने या चित्रपटाला यूए सर्टिफिकेट देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
या चित्रपटात रविनाने तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्यासोबत जबरदस्त रोमान्स सीन्स दिले आहेत. चित्रपटाच्या निर्मात्या शीतल तलवार यांच्या मते, चित्रपटावर बंदी आणने खूपच निराशाजनक आहे. जर अशाप्रकारची बंदी पहलाज निहलानी यांनी घातली असती तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या निर्णयाविरोधात पुढे आले असते. परंतु आता तशी परिस्थिती नाही. रिलीजदरम्यान काही सीन्समध्ये आॅडिओ कट्स लावून चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आले होते. या चित्रपटात रविनासोबत नवोदित कलाकार आशिष बिष्ट याने काम केले.
![]()
वास्तविक ओनीर यांच्या बहुतांश चित्रपटांमध्ये वारंगणा, होमोसेक्शुअॅलिटी आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे विषय असतात. जेव्हा सेन्सॉरने या चित्रपटाला टीव्ही रिलीज करण्यास बंदी आणली तेव्हा ओनीर यांनी ‘माय ब्रदर निखिल आणि मूनलाइट’सारख्या चित्रपटांचे उदाहरण देताना म्हटले की, हे चित्रपटदेखील होमोसेक्शुअॅलिटी आणि बोल्ड सब्जेक्टवर आधारित आहेत. या चित्रपटातील काही दृश्यांवर कट्स लावण्यात आले होते, परंतु टीव्हीवर टेलिकास्ट करण्यास बंदी आणली नव्हती.
![]()
दरम्यान, चित्रपटात रविनाने आशीष बिष्टसोबत खूपच बोल्ड सीन्स दिले आहेत. आशिषने एका मुलाखतीत कास्टिंग काउचविषयी बोलताना म्हटले होते की, निर्माते मला आॅडिशन्ससाठी बोलावित होते, परंतु त्यांच्याकडून एकच प्रश्न विचारला जात होता, तो म्हणजे तू बेडवर कम्फर्टेबल आहेस काय? असा खळबळजनक खुलासा केला होता. दरम्यान, चित्रपटावर बंदी घातल्याने, निर्माते काय पाऊल उचलणार हे बघणे मजेशीर राहील.