​अनुष्का शर्माच्या ‘फिल्लोरी’चे तिसरे पोस्टर आले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 17:36 IST2017-02-13T11:58:44+5:302017-02-13T17:36:23+5:30

अनुष्का शर्मा निर्मित ‘फिल्लोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर आपण बघितला. या ट्रेलरमधील कधी नव्हे इतकी सुंदर ‘चेटकिण’ही आपण बघितली. आता ...

The third poster of Anushka Sharma's 'Fillory' came! | ​अनुष्का शर्माच्या ‘फिल्लोरी’चे तिसरे पोस्टर आले!

​अनुष्का शर्माच्या ‘फिल्लोरी’चे तिसरे पोस्टर आले!

ुष्का शर्मा निर्मित ‘फिल्लोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर आपण बघितला. या ट्रेलरमधील कधी नव्हे इतकी सुंदर ‘चेटकिण’ही आपण बघितली. आता या ‘चेटकिणीचे’ आणखी एक रूप तुम्हाला बघायला मिळणार आहे. होय, ‘फिल्लोरी’चे तिसरे पोस्टर आज रिलीज झाले.  अनुष्काने आपल्या टिष्ट्वटर हँडलवर ‘फिल्लोरी’चे हे तिसरे पोस्टर जारी केले. 



या चित्रपटात अनुष्का शर्मा फ्रेंडली भूताच्या भूमिकेत आहेत. ‘फिल्लोरी’च्या या मजेदार अँगलने लोकांची उत्सूकता अर्थातच वाढलीय. आता या चित्रपटाचे तिसरे पोस्टर पाहिल्यानंतर तुमची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचणार आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्काने या चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज केले होते.  या पोस्टरमध्ये अनुष्का व दिलजीत दोसांज एकमेकांच्या डोळ्यांत आकंठ बुडालेले दिसले. आता या नव्या पोस्टरमध्ये दिलजीत, अनुष्कासोबतच ‘लाईफ आॅफ पाय’ फेम अभिनेता सूरज शर्मा सुद्धा दिसतोय.  
क्लिन स्लेट फिल्म आणि फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित या चित्रपटात अनुष्का एका ग्लॅमरस भूताची भूमिका साकारताना दिसतेयं. इच्छा अतृप्त राहिल्याने अनुष्काची आत्मा भटकते आहे.   सूरज शर्मा हा सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मंगळ असल्याने सूरजला मुलीशी लग्न करण्याआधी गावातील एका झाडाशी विवाह करावा लागतो. मात्र हे लग्न होत असताना या झाडावर राहणारी एक अतृप्त आत्मा(अनुष्का शर्मा) सूरजसमोर येते आणि स्वत:ची एक अतिशय रोमांचक प्रेमकथा त्याला ऐकवते. अनुष्काचे दिलजीत दोसांजवर प्रेम असते. पण हे प्रेम अधुरे राहते,असे या चित्रपटाचे कथानक आहे.    हा चित्रपट एक प्रेमकथा आहे.
अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘फिल्लोरी’ हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी अनुष्का निर्मित ह्यएनएच१०ह्ण या चित्रपटाने बरीच प्रशंसा मिळवली होती. आता अनुष्काचा हा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीत उतरतो, ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या मार्चमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे, तेव्हा तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच.

Web Title: The third poster of Anushka Sharma's 'Fillory' came!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.