They are madly in LOVE! दीपिका -रणवीर, आलिया- सिद्धार्थचे हे फोटो पाहून तुम्हालाही हेच वाटेल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2017 13:38 IST2017-04-09T08:08:27+5:302017-04-09T13:38:27+5:30

प्रेम कधीही लपत नाही. रणवीर सिंह- दीपिका पादुकोण आणि सिद्धार्थ मल्होत्रा - आलिया भट्ट या लव्हबर्ड्सबद्दल असेच म्हणावे लागेल. ...

They are madly in LOVE! Deepika-Ramvir, Alia-Siddhartha, you can see this photo! | They are madly in LOVE! दीपिका -रणवीर, आलिया- सिद्धार्थचे हे फोटो पाहून तुम्हालाही हेच वाटेल!!

They are madly in LOVE! दीपिका -रणवीर, आलिया- सिद्धार्थचे हे फोटो पाहून तुम्हालाही हेच वाटेल!!

रेम कधीही लपत नाही. रणवीर सिंह- दीपिका पादुकोण आणि सिद्धार्थ मल्होत्रा - आलिया भट्ट या लव्हबर्ड्सबद्दल असेच म्हणावे लागेल. बॉलिवूडचे मोस्ट गुडलूकिंग कपल दीपिका व रणवीर या दोघांचे ब्रेकअप झाले, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून कानावर येत होती. पण अलीकडे या दोघांचा एअरपोर्टवरचा एकत्र फोटो व्हायरल झाला अन् दोघांमध्येही ब्रेकअपसारखे काहीही नाही, हे स्पष्ट झाले. काल करण जोहरच्या घरच्या पार्टीच्या निमित्ताने तर ही बाब आणखीच स्पष्ट झाली.





दीपिका व रणवीर आजही रिलेशनशिपमध्ये आहेत आणि एकमेकांसोबत कमालीचे आनंदी आहेत, हे कालचे फोटो पाहिल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल.
काल रात्री उशीरा करणने आपल्या घरी पार्टी ठेवली होती. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक कपल्सने हजेरी लावली.



या पार्टीत रणवीर व दीपिकाही दिसले. रणवीरने तर एका चांगल्या बॉयफ्रेन्डसारखे दीपिकाला तिच्या घरून पिक केले. रणवीर व दीपिका यांच्यात आता कुणीही येऊ शकत नाही, हेच या फोटोवरून सिद्ध होते.





रणवीर व दीपिका या दोघांप्रमाणेच आलिया भट्ट आणि सिद्धार्थ कपूर हे कपलही करणच्या पार्टीत पोहोचले. सिद्धार्थ कार ड्राईव्ह करत होता तर त्याची लेडी लव्ह त्याच्या बाजूच्या सिटवर बसली होती. याच गाडीत आलियाची बेस्ट फ्रेन्ड अनुष्का रंजन ही सुद्धा दिसली. सिद्धार्थ व आलियाने त्यांचे रिलेशन आॅफिशिअली मान्य केलेल नाही. पण प्रत्येक इव्हेंटला या दोघांचे एकत्र जाणे, आपण बघतो आहोतच.



करणच्या या पार्टीत आलिया, सिद्धार्थ, रणवीर, दीपिका यांच्यासह मलायका अरोरा, जॅकलिन फर्नांडिस, सुशांतसिंह राजपूत असे अनेकजण दिसले.

Web Title: They are madly in LOVE! Deepika-Ramvir, Alia-Siddhartha, you can see this photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.