रिमा लागू यांच्याविषयी तुम्ही न ऐकलेल्या या काही गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 14:41 IST2017-05-18T09:07:54+5:302017-05-18T14:41:14+5:30
रिमा लागू यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनयात आपली एक वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर ...
रिमा लागू यांच्याविषयी तुम्ही न ऐकलेल्या या काही गोष्टी
र मा लागू यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनयात आपली एक वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर दिग्दर्शन क्षेत्राकडे वळण्याचे रिमा यांनी ठरवले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी त्यांची ही इच्छा लोकमत कार्यालयात व्यक्त केली होती.
![reema lagoo]()
हॉलिवूडमध्ये कलाकाराच्या वयानुरूप कलाकारासाठी भूमिका लिहिल्या जातात. त्यामुळे उतारवयातील कलाकारांनादेखील त्यांच्या भूमिका साकारता येतात. पण आपल्याकडे ते घडत नाही याची खंत रिमा लागू यांना होती.
![reema lagoo]()
रंगभूमीवर काम करायला रिमा लागू यांना खूप आवडायचे. त्यांनी मराठी, गुजराती, इंग्रजी अशा विविध भाषेच्या नाटकांमध्ये काम केले आहे.
![reema lagoo]()
चित्रपटातील आई म्हटली की, ती गरीब, कष्ट करणारी अशीच दाखवण्यात येत असे. पण रिमा यांनी हा ट्रेंड बदलला. रिमा यांच्या रूपाने अतिशय फॅशनेबल, आईच्या रूपातील मैत्रीण अशी आई प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
![reema lagoo]()
रिमा लागू त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बसने प्रवास करत असत. त्यांनी याविषयी अनेकवेळा सांगितले देखील आहे. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला बसने जात असत. तसेच त्या घरून नेहमी डबा घेऊन जात असत.
![reema lagoo]()
रिमा लागू यांनी लोकमतच्या ऑफिसला भेट दिली असता त्यांनी त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यांनी सांगितले होते की, आम्ही डबिंग करताना लाइटच्या खाली उभे राहायचो. तसेच सगळी वाक्ये आम्हाला लक्षात ठेवायला लागायची. तसेच त्या वेळात एडिटींग देखील खूप वेगळ्या प्रकारे व्हायचे.
![reema lagoo]()
नूतन ही रिमा लागू यांची आवडती अभिनेत्री होती. त्याचप्रकारे सुचित्रा सेन, वैजयंती माला यांच्या अभिनयाच्या त्या चाहत्या होत्या.
![reema lagoo]()
रिमा लागू यांची मुलगी मृण्मयी ही त्यांची सगळ्यात मोठी समीक्षक असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्या आणि मृण्मयी अनेकवेळा चित्रपटांवर गप्पा मारत असत.