‘या’ 5 सुपरस्टार्सनी केले आहे अतिशय कमी वयात लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 14:38 IST2020-02-28T14:36:18+5:302020-02-28T14:38:49+5:30

या इंडस्ट्रीत असेही काही स्टार्स आहेत ज्यांचे अतिशय कमी वयात लग्न झाले होते, तरीही त्यांनी यशस्वी झाल्यानंतर लग्न करण्याच्या विचारला छेद देत आपल्या करिअरमध्ये यशोशिखर गाठले. जाणून घेऊया अशा स्टार्सबाबत...

'These' stars married at a very young age! | ‘या’ 5 सुपरस्टार्सनी केले आहे अतिशय कमी वयात लग्न !

‘या’ 5 सुपरस्टार्सनी केले आहे अतिशय कमी वयात लग्न !

ठळक मुद्देबॉलिवूडमध्ये बरेचजण अगोदर यशस्वी होतात आणि त्यानंतर मग लग्न करतात.आपल्या यशात संसाराचा अडथळा ठरु नये म्हणून यशोशिखर गाठल्यानेच लग्न करावे असा त्यांचा समज असतो.या इंडस्ट्रीत असेही काही स्टार्स आहेत ज्यांचे अतिशय कमी वयात लग्न झाले होते, तरीही त्यांनी यशस्वी झाल्यानंतर लग्न करण्याच्या विचारला छेद देत आपल्या करिअरमध्ये यशोशिखर गाठले.

-रवींद्र मोरे
बॉलिवूडमध्ये बरेचजण अगोदर यशस्वी होतात आणि त्यानंतर मग लग्न करतात. कारण आपल्या यशात संसाराचा अडथळा ठरु नये म्हणून यशोशिखर गाठल्यानेच लग्न करावे असा त्यांचा समज असतो. मात्र या इंडस्ट्रीत असेही काही स्टार्स आहेत ज्यांचे अतिशय कमी वयात लग्न झाले होते, तरीही त्यांनी यशस्वी झाल्यानंतर लग्न करण्याच्या विचारला छेद देत आपल्या करिअरमध्ये यशोशिखर गाठले. जाणून घेऊया अशा स्टार्सबाबत...

* गोविंदा


बॉलिवूडचा कॉमेडी किंग आणि डान्सिंग सुपरस्टार गोविंदाने जेव्हा १९८७ मध्ये सुनीता सोबत लग्न केले तेव्हा तो फक्त २१ वर्षाचाच होता. अर्थात त्याने आपल्या करिअर यशस्वी होण्याअगोदरच लग्न केले होते. लग्नानंतर गोविंदाने खूप मेहनत करुन यशोशिखर गाठले. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर गोविंदा आणि सुनिता आजही एकमेकांसोबत सुखी आयुष्य जगत आहेत.

* सैफ अली खान


पतौडीचा नवाब अर्थात सैफ अली खानने जेव्हा अमृता सिंगसोबत लग्न केले तेव्हा तो फक्त २२ वर्षाचा होता. विशेष म्हणजे त्यावेळी अमृता त्याच्यापेक्षा ८ वर्षांनी मोठी होती. त्यामुळे या लग्नाच्या खूपच चर्चाही रंगल्या होत्या. मात्र काही वर्षानंतर या दोघांचा घटस्फोट झाला. सैफ अली खानपासून अमृताला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे दोन मुले आहेत. त्यापैकी सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. तर दुसरीकडे मुलगा इब्राहिम सुद्धा बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यासाठी सज्ज आहे.

* ऋतिक रोशन


अभिनेता संजय खान यांची मुलगी सुजैन खानसोबत जेव्हा ऋतिक रोशनने लग्न केले तेव्हा तो फक्त २६ वर्षाचा होता. विशेष म्हणजे लग्नाच्या वेळी ऋतिकचे करिअरमध्ये खूपच संघर्ष सुरु होते. दोघेही आपल्या संसारात रमले होते, मात्र काही कारणास्तव दोघांचा घटस्फोट झाला.

* आमिर खान


आज बॉलिवूडमध्ये आमिर खानची मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख आहे. आमिरचे लग्न १९८६ मध्ये रिना दत्तासोबत झाले होते. तेव्हा आमिर फक्त २१ वर्षाचाच होता. अर्थात त्याचा त्यावेळी करिअरसाठी संघर्ष सुरु होता. काही काळ एकत्र राहिल्यानंतर मात्र दोेघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिर खान ने किरण राव हिच्याशी लग्न केले. पत्नी किरणसोबत आमिर खान खूप सुखी आयुष्य जगत आहे.

* शाहरुख खान


बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरुख खानने गौरी खानसोबत २५ आॅक्टोबर १९९१ ला लग्न केले होते. त्यावेळी शाहरुख फक्त २५ वर्षाचा होता. शाहरुखचाही त्यावेळी संघर्षाचा काळ होता, मात्र या आपल्या स्ट्रगलिंगच्या काळातही शाहरुखने आपल्या प्रेमाला मागे सोडले नाही आणि आज तो पत्नी गौरी सोबत एक चांगले वैवाहिक आयुष्य जगत आहे.

Web Title: 'These' stars married at a very young age!