​‘या’ पाच भारतीय चित्रपटांच्या आॅस्करवारीवरूनही झालायं वाद!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 13:45 IST2017-09-25T08:15:44+5:302017-09-25T13:45:44+5:30

अभिनेता राजकुमार राव याच्या ‘न्यूटन’ या चित्रपटाच्या आॅस्करवारीवरून सध्या आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. आॅस्करच्या बेस्ट फॉरेन फिल्म कॅटेगिरीत भारताकडून ...

'These' films are also being made on the basis of the Oscars of five Indian films !! | ​‘या’ पाच भारतीय चित्रपटांच्या आॅस्करवारीवरूनही झालायं वाद!!

​‘या’ पाच भारतीय चित्रपटांच्या आॅस्करवारीवरूनही झालायं वाद!!

िनेता राजकुमार राव याच्या ‘न्यूटन’ या चित्रपटाच्या आॅस्करवारीवरून सध्या आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. आॅस्करच्या बेस्ट फॉरेन फिल्म कॅटेगिरीत भारताकडून ‘न्यूटन’ला नामांकन देण्यात आले आहे. अर्थात ‘न्यूटन’च्या कंटेन्टवर सध्या भलतेच आरोप होत आहे. हा चित्रपट ‘सीक्रेट बॅलेट’ या इराणी चित्रपटापासून प्रेरित, एकार्थाने या चित्रपटाची कॉपी असल्याचा आरोप ठेवल्या गेल्या आहे. अर्थात ‘न्यूटन’चे दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. खरे तर आॅस्कर नामांकन आणि वाद हा वाद आपल्या भारतीयांसाठी नवा नाही. याआधीही भारताकडून आॅस्करसाठी पाठवण्यात आलेल्या चित्रपटांवर वाद झाला आहे. एक नजर अशाच वादांवर...

देवदास



सन २००२ साली भारताकडून संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ आॅस्करसाठी पाठवण्यात आला होता. ऐश्वर्या राय बच्चन, शाहरूख खान यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक सर्वोत्तम कलाकृती होती, यात शंका नाही. पण याचवर्षी रिलीज झालेला मणिरत्नम यांच्या ‘कनाथी मुथमित्तल’ हा चित्रपट त्याच्या वेगळ्या विषयामुळे आॅस्करसाठी पाठवला जायला हवा होता, असा मानणारा एक मतप्रवाह होता. त्यामुळे ‘देवदास’च्या आॅस्करवारीवर बरीच चर्चा रंगली होती.

जीन्स



ऐश्वर्या रायचा तामिळ चित्रपट ‘जीन्स’ला आॅस्करसाठी पाठवण्यात आले होते. पण त्याचवर्षी ‘सत्या’ हा हिंदी चित्रपट आला होता. आजही ‘सत्या’ हा रामगोपाल वर्मा यांचा सर्वात उत्तम चित्रपट मानला जातो. या चित्रपटाला डावलून ‘जीन्स’ला आॅस्करसाठी पाठवल्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

पहेली



सन २००५मध्ये शाहरूख खान व राणी मुखर्जी यांच्या ‘पहेली’ला आॅस्करवारीची संधी मिळाली होती. पण अनेकांनी या निर्णयावर टीका केली होती. कारण त्यावर्षीआशुतोष गोवारीकर यांचा ‘स्वदेश’ आला होता. हा चित्रपट प्रत्येक बाबतीत ‘पहेली’पेक्षा सरस मानला गेला होता.

बर्फी



२०१२ मध्ये रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, इलियाना डिक्रूज यांचा ‘बर्फी’ आॅस्करसाठी पाठवला गेला होता. याचवर्षी ‘गँग्स आॅफ वासेपूर’ आणि ‘पान सिंह तोमर’ हे दोन सिनेमे रिलीज झाले होते. ‘बर्फी’ऐवजी या दोनपैकी एका चित्रपटाची आॅस्करसाठी निवड व्हायला हवी होती, असे अनेकांचे मत पडले होते.

द गुड रोड



ALSO READ : वाचा, ‘कॉपी’च्या आरोपावर ‘न्यूटन’चे दिग्दर्शक अमित मसूरकर यांचा खुलासा!

‘लंच बॉक्स’ हा इरफान खानचा चित्रपट डावलून ‘द गुड रोड’ या गुजराती चित्रपटाला आॅस्करसाठी निवडले गेले होते. ‘लंच बॉक्स’ला अनेक फिल्म फेस्टिवल्समध्ये प्रशंसा मिळाली होती. त्यामुळे ‘लंच बॉक्स’ऐवजी ‘द गुड रोड’ला आॅस्करसाठी निवडणे, अनेकांनी चुकीचे ठरवले होते.

Web Title: 'These' films are also being made on the basis of the Oscars of five Indian films !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.