बॉलिवूडमधील या चित्रपटांना होते दोन मध्यांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 14:43 IST2018-06-06T09:13:30+5:302018-06-06T14:43:30+5:30
कोणताही चित्रपट म्हटला की, त्या चित्रपटाला एक मध्यांतर असतो हे आपणा सर्वांनाच माहीत आहे... पण तुम्हाला माहीत आहे का, ...

बॉलिवूडमधील या चित्रपटांना होते दोन मध्यांतर
क णताही चित्रपट म्हटला की, त्या चित्रपटाला एक मध्यांतर असतो हे आपणा सर्वांनाच माहीत आहे... पण तुम्हाला माहीत आहे का, की बॉलिवूडमधील एका नव्हे तर दोन चित्रपटांना एक नव्हे तर दोन मध्यांतरं होती. बॉलिवूडमधील मेरा नाम जोकर आणि संगम या चित्रपटांना दोन मध्यांतरं होती. मेरा नाम जोकर या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूर यांनी तर या चित्रपटाची निर्मिती आर के बॅनरने केली होती. हा चित्रपट राज कपूर यांचा एक महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट होता.
मेरा नाम जोकर या चित्रपटात एका मुलाच्या विविध वयोगटातील आयुष्य आपल्याला पाहायला मिळाले होते. हा चित्रपट हा आजवरच्या बॉलिवूडमधील सगळ्यात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट खूपच मोठा असल्याने या चित्रपटाला दोन मध्यांतरं ठेवण्यात आली होती. हा चित्रपट जवळजवळ २५५ मिनिटांचा होता. या चित्रपटात स्वतः राज कपूर यांनी काम केले होते तर राज कपूर यांच्या लहानपणीची भूमिका ऋषी कपूरने साकारली होती. ऋषी कपूरचा हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात राज कपूर यांच्यासोबत सिमी गरेवाल, मनोज कुमार, धर्मेंद्र, दारा सिंग, पद्मिनी, राजेंद्र कुमार यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट बनवण्यासाठी जवळजवळ सहा वर्षं लागली होती. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च हा प्रचंड होता. पण एवढे होऊनही या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवता आले नाही. या चित्रपटामुळे राज कपूर यांचे प्रचंड नुकसान झाले होते. पण असे असले तरी आज क्लासिक चित्रपटात या चित्रपटाची गणना केली जाते.
राज कपूर यांचा संगम हा चित्रपट देखील तीन तास ५८ मिनिटांचा होता. या चित्रपटामध्ये राज कपूर, राजेंद्र कुमार, वैजयंती माला यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला देखील दोन इंटलव्हल होते. या चित्रपटात राज कपूर आणि राजेंद्र कुमार हे एकमेकांचे अतिशय जवळचे मित्र असल्याचे दाखवण्यात आले होते तर या दोघांचेही प्रेम वैजंयती मालावर असते. या प्रेमकथेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
Also Read : या अभिनेत्रीमुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा... राजीवने राज यांच्या अंत्यसंस्काराला देखील लावली नव्हती हजेरी