‘हे’ आहेत स्पेशल इफेक्टसवर आधारित बॉलिवूडचे बेस्ट वैज्ञानिक चित्रपट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 18:36 IST2017-08-31T13:05:13+5:302017-08-31T18:36:11+5:30
अबोली कुलकर्णी चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम. ही संकल्पना आपल्याला ठाऊक आहे मात्र, काळाच्या ओघात या संकल्पनेने आता थोडेसे प्रगत ...

‘हे’ आहेत स्पेशल इफेक्टसवर आधारित बॉलिवूडचे बेस्ट वैज्ञानिक चित्रपट !
चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम. ही संकल्पना आपल्याला ठाऊक आहे मात्र, काळाच्या ओघात या संकल्पनेने आता थोडेसे प्रगत रूप घेतले आहे. वैज्ञानिक संकल्पना, थेरपी, टाइम मशीन यांच्यावर आधारित चित्रपटांची निर्मिती बॉलिवूडमध्ये झाली. अशा चित्रपटांसाठी निर्माता, दिग्दर्शक यांना भव्य सेटअप उभा करावा लागला, कोट्यांशी रूपयांचा खर्च करावा लागला. मात्र, बॉलिवूडमध्ये स्पेशल इफेक्टस देऊन बेस्ट वैज्ञानिक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. घेऊयात बॉलिवूडच्या अशाच काही वैज्ञानिक चित्रपटांचा आढावा...
* मि.इंडिया
शेखर कपूर दिग्दर्शित ‘मि.इंडिया’ चित्रपट हा तत्कालीन बेस्ट वैज्ञानिक कन्सेप्टवर आधारित सुपरहिरो प्रकारात मोडणारा चित्रपट तयार करण्यात आला. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपटात अमरिश पुरी (मोगँबो) या खलनायकाच्या भूमिकेत दिसले. मोगँबोला संपूर्ण भारत स्वत:च्या कब्जात घ्यायचा असतो. पण, अरूण (अनिल कपूर) चे वडीलांनी एक घड्याळ बनवलेले असते. ते मनगटावर बांधल्यावर तो अदृश्य होऊ शकतो. या माध्यमातून तो मोगँबोला परावृत्त करून भारताला त्याच्या कचाट्यातून सोडवतो.
* कोई मिल गया
राकेश रोशन, रेखा, हृतिक रोशन आणि प्रिती झिंटा यांच्या मुख्य भूमिकेतील ‘कोई मिल गया’ चित्रपट परग्रहावरील लोकांवर चित्रीत करण्यात आला होता. हा चित्रपट स्पेस शिप्स आणि परग्रहावरील लोकांचा वावर यावर आधारित होता. २००३ च्या सुपरहिट चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना आजही होते.
* क्रिश
राकेश रोशन दिग्दर्शित ‘क्रिश’ चित्रपटात प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, नसिरूद्दीन शाह हे मुख्य भूमिकेत दिसून आले. क्रिश या चित्रपटाला पहिल्या भारतीय सुपरहिरो चित्रपटाचा मान मिळाला. ‘कोई मिल गया’ चा ‘क्रिश’ हा चित्रपट सिक्वेल आहे. या चित्रपटातील स्पेशल इफेक्टसही आश्चर्यचकित करणारे आहेत.
* लव्हस्टोरी २०५०
हर्मन बावेजा (करण मल्होत्रा) आणि प्रियांका चोप्रा यांचा ‘लव्हस्टोरी २०५०’ हा एक रोमँटिक वैज्ञानिक फिक्शन आधारित चित्रपट आहे. यात प्रियांका (सना)चा अपघात होऊन तिचा मृत्यू होतो. बोमन इरानी (वैज्ञानिक) एका टाइम मशीनची निर्मिती करतो. ज्यातून हर्मन प्रियांकाला भविष्यातून परत घेऊन येतो.
* रा.वन
१२५ कोटी बजेट असलेल्या ‘रा.वन’ चित्रपटात शाहरूख खान, करिना कपूर आणि अर्जुन रामपाल हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटाची स्क्रिप्ट फार काही प्रभावी नव्हती. मात्र, हा चित्रपट केवळ स्पेशल इफेक्टससाठीच बघितला जातो. हा चित्रपट डोमॅस्टिक हिट आणि सुपरहिटही मानला जातो.