'भारत' सिनेमामुळे सुनील ग्रोवरच्या लोकप्रियतेत वाढ, महिला वर्गाकडून मिळते सर्वात जास्त प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 15:46 IST2019-07-10T15:43:00+5:302019-07-10T15:46:33+5:30

बॉलिवूडमध्ये त्याने आज आपले वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सुनिल ग्रोवरचाही आपला एक वेगळा चाहता वर्ग आहे.  छोट्या पडद्यावरील 'गुत्थी' आणि 'मिस्टर गुलाटी' हे दोन्ही कॅरेक्टर त्याचे तुफान हिट ठरले.

There’s This Female Attention Now, Says Sunil Grover on Life Post Bharat’s Success | 'भारत' सिनेमामुळे सुनील ग्रोवरच्या लोकप्रियतेत वाढ, महिला वर्गाकडून मिळते सर्वात जास्त प्रशंसा

'भारत' सिनेमामुळे सुनील ग्रोवरच्या लोकप्रियतेत वाढ, महिला वर्गाकडून मिळते सर्वात जास्त प्रशंसा

कॉमेडी सुनिल ग्रोवरने छोट्या पडद्याच्या माध्यमातून रसिकांना आपल्या कॉमेडीने हसुन हसुन लोटपोट केले. छोटाय पडदा गाजवल्यानंतर तो रूपेरी पडद्यावर झळकला. बॉलिवूडमध्ये त्याने आज आपले वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सुनिल ग्रोवरचाही आपला एक वेगळा चाहता वर्ग आहे.  छोट्या पडद्यावरील 'गुत्थी' आणि 'मिस्टर गुलाटी' हे दोन्ही कॅरेक्टर त्याचे तुफान हिट ठरले. इतकेच नव्हे तर सलमान खानच्याभारत सिनेमातील त्याच्या भूमिकेने तर रसिकांची मनं जिंकली आहेत. वेगवेगळ्या स्थरावरून त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे. त्यामुळे भारत सिनेमामुळे त्याच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

सुनिल ग्रोवरने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारत सिनेमात झळकल्यानंतर माझ्या चाहत्यांच्या यादी महिलावर्गाचा मोठा समावेश आहे. मी आज महिला वर्गात सर्वात फेव्हरेट अभिनेता बनल्याचा मला खूप आनंद आहे. माझी भूमिका पाहिल्यानंतर मला खूप सा-या कॉम्लिमेंट मिळतात, मात्र जेव्हा महिला माझी स्तुती करतात तेव्हा मला जास्त आनंद होतो असे सुनिलने सांगितले. फीमेल ऑडीयन्सचे मिळणारे अटेंशन पाहून आज ''मै उपर आसमाँ निचे अशीच अवस्था आहे.


अली अब्बास जफ़रने भारत सिनेमाचे दिग्दर्शन केले असून सलमान खान आणि कटरिना कैफ, जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी, सोनाली कुलकर्णी आणि सुनील ग्रोवर झळकले होते.'भारत' सिनेमाच्या यशानंतर सुनिल ग्रोवर कोणत्या सिनेमात झळकणार याचीच उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली असणार हे मात्र नक्की. 

Web Title: There’s This Female Attention Now, Says Sunil Grover on Life Post Bharat’s Success