​फिल्मफेअर बेस्ट अ‍ॅक्टरच्या यादीत अक्षयचे नाव नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 19:08 IST2017-01-11T19:08:08+5:302017-01-11T19:08:08+5:30

बॉलिवूडचा आॅस्कर समजल्या जाणाºया फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डचे नॉमिनेशन जाहीर झाले आहे. सध्या बॉलिवूडमध्ये ६१ व्या फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन मिळविलेल्या बातम्या ...

There is no name in the list of Filmfare Best Actor! | ​फिल्मफेअर बेस्ट अ‍ॅक्टरच्या यादीत अक्षयचे नाव नाही!

​फिल्मफेअर बेस्ट अ‍ॅक्टरच्या यादीत अक्षयचे नाव नाही!

लिवूडचा आॅस्कर समजल्या जाणाºया फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डचे नॉमिनेशन जाहीर झाले आहे. सध्या बॉलिवूडमध्ये ६१ व्या फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन मिळविलेल्या बातम्या हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे बेस्ट अ‍ॅक्टर (मेल)साठी दिला जाणाºया अ‍ॅवॉर्डच्या यादीत चर्चेत नसलेल्या चित्रपटांची नावे आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासोबतच काही कलावंताना डावलल्याचा आरोप करण्यात येत आहे.

फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डसाठी नॉमिनेट केलेल्या उत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीत सात अभिनेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात आमिर खान (दंगल), सलमान खान (सुलतान), शाहरुख खान (फॅन), अमिताभ बच्चन (पिंक), रणबीर कपूर (ऐ दिल है मुश्किल), सुशांत सिंग राजपूत (एम.एस.धोनी : अनटोल्ड स्टोरी), शाहिद क पूर (उडता पंजाब) यांचा समावेश करण्यात आला आहे. या नामांकनात शाहरुखचा फॅन व शाहिद कपूरचा उडता पंजाब हे चित्रपट बॉक्स आॅफिसवर अपयशी ठरले आहेत. 

ajay devgan

या वर्षीच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला व बॉक्स आॅफिसवर १०० कोटीची कमाई करणारा पहिला चित्रपट ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात अक्षय कुमारने साकारलेली रणजीत कात्याल या भूमिकेचे समीक्षकांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केले होतो. अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिवाय’मधील त्याच्या भूमिकेची प्रशंसा करण्यात आली होती, मात्र या दोन्ही चित्रपटातील भूमिकांसाठी अक्षय कुमार व अजय देवगनचा यात यादीत समावेश करण्यात आला नाही. मागील वर्षी देखील अक्षय कुमारला ‘बेबी’ व अजय देवगनला ‘दृष्यम’साठी नामांकन देण्यात आले नव्हते. 

सध्याच्या ट्रेन्डनुसार १०० कोटी कमाई करणारा चित्रपट यशस्वी समजला जातो. अक्षय कुमारचे या वर्षी तीन चित्रपट प्रदर्शित झाले. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर १०० कोटीहून अधिकचा गल्ला जमविला.  यापैकी एअरलिफ्ट व रुस्तममधील त्याच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले होते. 
काही वर्षांपूर्वी आमिर खानने अ‍ॅवॉर्ड देण्यात दुजाभाव केला जातो असे मत मांडून पुरस्कार समारंभात जाण्याचे टाळले होते. आता अजय देवगन व अक्षय कुमार यावर काय प्रतिक्रिया देतात हे लवकरच कळेल. 

Web Title: There is no name in the list of Filmfare Best Actor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.