जुनी गाणी ऐकणार आजही मोठा वर्ग आहे- पंकज उदास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 12:05 PM2018-07-25T12:05:48+5:302018-07-25T12:11:36+5:30

मी नशीबावर खूप जास्त विश्वास ठेवतो. तुमचे नशिब तुम्ही बदलू शकत नाही. मला वाटते माझा जन्म गझल गाण्यासाठीच झाला आहे.

There are still big classes to hear the old songs- Pankaj Blues | जुनी गाणी ऐकणार आजही मोठा वर्ग आहे- पंकज उदास

जुनी गाणी ऐकणार आजही मोठा वर्ग आहे- पंकज उदास

googlenewsNext
ठळक मुद्देआजचे बॉलिवूडचे संगीतकार हे खूप जास्त पाश्चामात्य संगीतातून प्रभावित आहेभविष्यात मी विचार करतोय गझलचा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा घेऊन यायचा

गीतांजली आंब्रे 

पकंज उदास यांनी भारतीय संगीतात गझलला वेगळे स्थान निर्माण करुन दिले. 'चिठ्ठी आई है' या गाण्यानंतर ते प्रकाशझोतात आले. गेली 17 वर्ष ते गझलला जीवंत ठेवण्यासाठी 'खजाना' नावाची स्पर्धा घेतायेत. खजानाच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली सुरेल बातचित 

'खजाना' या गझल स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही देशाच्या कानकोपऱ्यात फिरलात त्या अनुभवाबद्दल काय सांगाल ?
आमच्याकडे देशातल्या 75 शहरामंधून एंट्री आल्या होत्या. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटले, आलेल्या सगळ्या एंट्री या 20 ते 27 वर्षांमधल्या मुलांच्या होत्या. त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे की तरुण मुलांमध्ये आजही गझलची आवड आहे. ही सगळी मुलं खूप फोकस आहेत. यावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे आजही गझल तेवढीच लोकप्रिय आहे जेवढी याआधी होती. 

तुम्ही एका इंटव्हु दरम्यान सांगितल होते की, तुमचे लहानपणी डॉक्टर होण्याचे स्वप्न होते मग आज मागे वळून पाहताना कसे वाटते?
मी डॉक्टर होण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले होते, खूप मेहनत देखील घेतली मात्र देवाने माझ्यासाठी काही तरी वेगळेच लिहुन ठेवले होते. मी नशीबावर खूप जास्त विश्वास ठेवतो. तुमचे नशिब तुम्ही बदलू शकत नाही. मला वाटते माझा जन्म गझल गाण्यासाठीच झाला आहे. मी खूप खूश आहे की मी डॉक्टर न होता गझल गायक पंकज उदास झालो. 

आजच्या बॉलिवूडच्या संगीताबाबत तुम्हाला काय वाटते?
आजचे बॉलिवूडचे संगीतकार हे खूप जास्त पाश्चिमात्य संगीतातून प्रभावित आहेत असे मला वाटते. त्यामुळे बॉलिवूडच्या गाण्यांमध्ये खूप जास्त पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव जाणवतो. हिंदी गाण्याचे संगीत वर्ल्ड म्युझिककडे जाते आहे. आपल्याला कानाना सुरुवातीपासून एका ठराविक पद्धतीचे संगीत ऐकण्याची सवय झालीय. त्यामुळे आजच्या तरुणांमध्ये दोन गट झाले आहेत.ज्यात  एक वर्ग असा आहे की ज्यांना आजच्या काळातील संगीत ऐकतात तर दुसरा मोठा वर्ग असा आहे ज्यांना जुन्या काळातील संगीतच ऐकायला आवडते. 

गझल आजच्या जनरेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या रिअॅलिटी शोचा आधार घेता येईल का ?
मी तसा प्रयत्न 1997 ते 1998मध्ये केला होता. या दरम्यान मी एक कार्यक्रम लाँच केला होता 'आदाब- अर्ज- है' असे त्याचे नाव होते. त्या कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला होता जवळपास एक वर्ष तो कार्यक्रम चालला होता. त्याला मिळणाऱ्या प्रतिक्रिया ही खूप साकारात्मक होत्या. मात्र दुर्देवाने काही कारणांमुळे आम्हाला तो कार्यक्रम बंद करावा लागला. भविष्यात मी विचार करतोय गझलचा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा घेऊन यायचा. 
   

Web Title: There are still big classes to hear the old songs- Pankaj Blues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.