'शोले' चित्रपटातील 'या' अभिनेत्याला आता ओळखणंही झालंय कठीण, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 07:00 PM2019-10-27T19:00:00+5:302019-10-27T19:00:00+5:30

बॉलिवूडचे हे अभिनेते गेल्या ७ वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहेत.

Then And Now Bollywood Actor Jagdeep Gets IIFA Award 2019 Transformation In Looks At 61 Years | 'शोले' चित्रपटातील 'या' अभिनेत्याला आता ओळखणंही झालंय कठीण, वाचा सविस्तर

'शोले' चित्रपटातील 'या' अभिनेत्याला आता ओळखणंही झालंय कठीण, वाचा सविस्तर

googlenewsNext


नुकतेच आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते जगदीप यांना लाइफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जगदीप  ८० वर्षांचे असून ते गेल्या ७ वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहेत.

आयफा पुरस्कारात जगदीप व्हिलचेअरवर आपले दोन्ही मुलं जावेद व नावेद यांच्यासोबत आले होते. बॉलिवूडमध्ये जगदीप कॉमेडीतील अचूक टायमिंगसाठी ओळखले होते. गेल्या ६१ वर्षांपासून त्यांनी लोकांचे मनोरंजन केले आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यात त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे. त्यांच्यामध्ये आता खूप बदल झाला आहे.


प्रसिद्ध अभिनेते जगदीप यांनी ४०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी शोले चित्रपटात सूरमा भूपालीची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून ते लोकप्रिय झाले.

जगदीप यांनी चित्रपटसृष्टीतील करियरला १९५१ साली बी.आर. चोप्रा यांच्या 'अफसाना' चित्रपटातून सुरूवात केली होती. त्यांनी या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे.


जगदीप यांनी 'अब दिल्ली दूर नहीं', 'मुन्ना', 'आर पार', 'दो बीगा जमीन' आणि 'हम पंछी एक डाल के' या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटानंतर जगदीप यांची लोकप्रियता वाढली होती. त्यानंतर त्यांना मुख्य अभिनेता म्हणून काम मिळायला लागले. या सिनेमांमध्ये 'भाभी' व  'बरखा'चा समावेश आहे. त्यानंतर जगदीप यांनी 'ब्रह्माचारी' सिनेमातून कॉमेडियन म्हणून स्थापित केलं.


या व्यतिरिक्त  'फिर वही बात', 'पुराना मंदिर', 'खूनी पंजा', 'काली घटा', 'सुरक्षा', 'स्वर्ग नरक', 'कुर्बानी', 'शहंशाह' या चित्रपटात झळकले आहेत.


कॉमेडियन अभिनेता जगदीप यांनी बॉलिवूडमध्ये अशा काही भूमिका केल्या ज्या आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या भूमिकांमध्ये 'शोले' चित्रपटातील सूरमा भूपाली आणि 'अंदाज अपना अपना' सिनेमात सलमान खानच्या वडिलांच्या भूमिकेचा समावेश आहे. 


जगदीप यांनी शेवटचे २०१२ साली 'गली गली चोर है' या चित्रपटात काम केले होते. 

Web Title: Then And Now Bollywood Actor Jagdeep Gets IIFA Award 2019 Transformation In Looks At 61 Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.