ट्रेन वेगाने आमच्याकडे येत होती, तितक्यात...; अपघातातून सलमान खानने आयशा जुल्काला कसं वाचवलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 11:40 IST2025-03-19T11:39:46+5:302025-03-19T11:40:23+5:30
Salman Khan And Ayesha Jhulka : एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मोठा अपघात होणार होता. पण सलमान खानच्या सतर्कतेमुळे आयशा जुल्काचे प्राण वाचले.

ट्रेन वेगाने आमच्याकडे येत होती, तितक्यात...; अपघातातून सलमान खानने आयशा जुल्काला कसं वाचवलं?
नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आयशा झुल्का(Ayesha Julka)ने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि बॉलिवूडच्या टॉप हिरोइन्सच्या यादीत तिचा समावेश होता. त्यावेळी चित्रपटाच्या सेटवर सुरक्षा प्रोटोकॉल फारसे कडक नव्हते. त्यामुळेच अनेक जीवघेणे अपघात टळले. अशाच एका अपघातात आयशा जुल्कादेखील थोडक्यात बचावली होती. या अपघातातून बॉलिवूडचा भाईजान सलमान खान(Salman Khan)ने वाचवले होते. ही गोष्ट आहे १९९१ या साली आलेल्या 'कुर्बान' चित्रपटाच्या सेटवरची. आयशाने एका मुलाखतीत सांगितले की, सलमानने तिचा जीव कसा वाचवला होता.
आयशा जुल्काने 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती आणि सलमान रेल्वे ट्रॅकवर शूटिंग करत होते. तेवढ्यात अचानक एक ट्रेन त्यांच्या दिशेने वेगाने येऊ लागली. मात्र सलमानने चपळाई दाखवत आयेशा जुल्काला स्वतःकडे ओढले. आयशा जुल्काने सांगितले की, नव्वदच्या काळात सेटवर वॉकी-टॉकी नव्हत्या. अशा परिस्थितीत, लोक एकतर मोठ्या आवाजात सूचना देतात किंवा कमांडचा संकेत देण्यासाठी ध्वज फडकावतात. आयशाच्या म्हणण्यानुसार ते दोघे इगतपुरीत रेल्वे ट्रॅकवर शूटिंग करत होते. त्यावेळी त्या ट्रॅकवर एकही ट्रेन येणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले होते.
'सलमानने ऐकला ट्रेनचा आवाज, मला ओढले'
आयशा म्हणाली, 'कॅमेरामनने कॅमेरा लावला. मला ट्रॅकवर डान्स करायचा होता आणि माझ्या आधी सलमान ट्रॅकवर नाचत होता. आयशा जुल्का पुढे म्हणाली, 'स्टेशन खूपच लहान होते आणि आजूबाजूला फारसे लोक नव्हते. आम्ही आवश्यक असलेल्या परवानग्या घेतल्या होत्या. आमचे गाणे खूप जोरात वाजत होते. आम्ही पुन्हा-पुन्हा रिहर्सल करत होतो आणि अचानक मला इतका जोरात ओढले गेले की माझे सर्व अवयव हादरुन गेले. ट्रेनचा आवाज ऐकून सलमानने मला ओढले. काही वेळ समजलेच नाही की काय झाले? तो (सलमान खान) युनिटमधील लोकांवर ओरडत होता. तो ट्रॅकवर येऊ शकला असता कारण तो माझ्या आधी शॉट्स देत होता.
वर्कफ्रंट
'कुर्बान' हा आयशा झुल्काचा पहिला हिंदी चित्रपट होता. यानंतर तिने अनेक चित्रपट केले. तिने रिॲलिटी शो आणि ओटीटीमध्येही काम केले आहे.