ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार सलमान खानच्या टायगर-3 ’चा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 01:06 PM2023-10-04T13:06:41+5:302023-10-04T13:10:55+5:30

टायगर 3 चा ट्रेलर 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

The trailer of Salman Khan's Tiger 3 will be released on this day | ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार सलमान खानच्या टायगर-3 ’चा ट्रेलर

Salman Khan

googlenewsNext

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या एक था टायगर आणि टायगर जिंदा है या दोन चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच टायगर-3  दिवाळीच्या मुहूर्तावर  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  सलमान खानने नुकताच टायगर 3 चा टीझर रिलीज केला होता आणि आता ट्रेलरची रिलीज डेटही समोर आली आहे.

 'टायगरचा मॅसेज' 27 सप्टेंबर रोजी रिलीज करण्यात आला होता. यात 'टायगर 3' ची झलक पाहायला मिळाली होती.  यानंतर आता टायगर 3 चा ट्रेलर 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर लाँच  झाल्यानंतर चित्रपटातील गाणी लाँच होणार आहेत.  या  संदर्भात यशराज फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

'टायगर 3'मध्ये सलमान खानसोबतकतरिना कैफ, इमरान हाश्मी, रेवती, रिद्धी डोग्रा आणि रणवीर शौरी हे कलाकार दिसणार आहेत. शाहरुख खानही या चित्रपटात 'पठाण'च्या भूमिकेत कॅमिओ करणार आहे. शिवाय, या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि कतरिनाची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. त्यामुळे दोघांचे चाहते फार उत्सुक आहेत. ‘टायगर’ आणि ‘टायगर 2’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. 

'टायगर 3' हा YRF spy universe अंतर्गत बनवला जाणारा पाचवा चित्रपट आहे. याशिवाय, हा या फ्रेंचाइजीचा सर्वात महागडा चित्रपट आहे. 300 ते 350 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात येतोय.  'बँड बाजा बारात' आणि 'फॅन' सारखे चित्रपट बनवणाऱ्या मनीष शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 
  

Web Title: The trailer of Salman Khan's Tiger 3 will be released on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.