'फायटर' चा थक्क करणारा टीझर रिलीज, एरिअल शॉट्स अन् हृतिकच्या चार्मिंग लूकने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:39 PM2023-12-08T12:39:22+5:302023-12-08T12:40:10+5:30

'फायटर'चा टीझर अंगावर शहारे आणणारा आहे.

The stunning teaser release of Fighter movie released Hrithik Roshan in charming look | 'फायटर' चा थक्क करणारा टीझर रिलीज, एरिअल शॉट्स अन् हृतिकच्या चार्मिंग लूकने वेधलं लक्ष

'फायटर' चा थक्क करणारा टीझर रिलीज, एरिअल शॉट्स अन् हृतिकच्या चार्मिंग लूकने वेधलं लक्ष

हृतिक रोशनचा (Hrithik Roshan)आगामी 'फायटर' (Fighter) सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हृतिक आणि दीपिका पदुकोणची जोडी यामध्ये कमाल दिसत आहे. तसंच अनिल कपूरचीही टीझरमध्ये झलक दिसते. 1 मिनिट 13 सेकंदाच्या या टीझरमध्ये फायटर जेट्सचे एरिअल शॉट्स श्वास रोखून धरणारे आहेत.

'फायटर'चा टीझर अंगावर शहारे आणणारा आहे. शिवाय बॅकग्राऊंड म्यूझिकमुळेही एक वेगळाच माहोल तयार होतो. ही एक अॅक्शन फिल्म असणार आहे ज्यामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर आहेत. तर अनिल कपूर ग्रुप कॅप्टन शमशेर पठानियाच्या भूमिकेत आहे. टीझरमध्ये हृतिकचा चार्मिंग अंदाज प्रेमात पाडणारा आहे. तसंच हृतिक-दीपिकाचा रोमँटिक अँगलही पाहायला मिळत आहे. सिनेमाचं मुख्य आकर्षण म्हणजे फायटर जेट्सचे अप्रतिम आणि थक्क करणारे शॉट्स आहेत. हे मोठ्या पडद्यावर पाहायला नक्कीच मजा येणार आहे. टीझरला काही तासातच लाखो व्ह्यूझ मिळाले आहेत.

'फायटर' सिनेमाचं एकूण बजेट 250 कोटी रुपये इतकं आहे. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर 25 जानेवारी 2024 रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे. 'पठाण' आणि 'वॉर'चं दिग्दर्शन करणाऱ्या सिद्धार्थ आनंदने 'फायटर' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाविषयी बोलताना ते म्हणाले,'मला फायटरकडून खूप अपेक्षा आहेत. प्रेक्षकांनी आजपर्यंत पाहिलं नसेल असं काही सिनेमात पाहायला मिळेल. या सिनेमातून मी अनेक गोष्टी एक्सप्लोर केल्या आहेत. माजी आर्मी ऑफिसर आणि लेखर रेमन छिब यांनी सिद्धार्थ आनंदसोबत सिनेमाची कहाणी लिहिली आहे.

Web Title: The stunning teaser release of Fighter movie released Hrithik Roshan in charming look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.