'रितेश देशमुखच्या मुलांचे संस्कार बघा', करिना-सैफच्या छोट्या लेकाच्या 'त्या' कृतीवर भडकले नेटकरी; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 16:37 IST2024-03-04T16:27:32+5:302024-03-04T16:37:04+5:30

करिनाचा धाकटा लेक नवाब जहांगीर अली खान उर्फ ​​'जेह बाबा'चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

The netizens are slamming Kareena Kapoor Khan and husband Saif Ali Khan over Jeh DEETS INSIDE | 'रितेश देशमुखच्या मुलांचे संस्कार बघा', करिना-सैफच्या छोट्या लेकाच्या 'त्या' कृतीवर भडकले नेटकरी; पाहा व्हिडीओ

'रितेश देशमुखच्या मुलांचे संस्कार बघा', करिना-सैफच्या छोट्या लेकाच्या 'त्या' कृतीवर भडकले नेटकरी; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर कायम चर्चेत असते. करीनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.  केवळ करीना कपूर खानच नाही तर तिची दोन मुले तैमूर अली खान आणि जेह अली खान देखील लोकप्रिय आहेत. सैफ अली खानच्या लाडक्या मुलांचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ समोर येताच इंटरनेटवर व्हायरल होतो. नुकतेच करिनाचा धाकटा लेक नवाब जहांगीर अली खान उर्फ ​​'जेह बाबा'चा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरुन नेटकऱ्यांनी मात्र करीना कपूरच्या लाडक्या मुलाला खूप ट्रोल केलं आहे. 

 अलीकडेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये करीना आणि सैफ यांनी हजेरी लावली. यावेळी ते आपल्या दोन्ही मुलांसोबत जामनगरमध्ये पोहचले होते. तिन दिवस चाललेला प्री-वेडिंग फंक्शन संपल्यानंतर करीना कपूर खान  सैफ अली खान, करिश्मा कपूर, जेह आणि तैमूर मुंबईला परतले. अशातच करीना कपूर व सैफ अली खानचा लहान मुलगा जेह अली खाननं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जेह हा कॅमेऱ्याकडे पाहात पापराझांनी चिडवताना दिसला.  त्याच्या या कृतीमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

जेहचा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.  काही यूजर्स त्याच्या क्यूटनेसचे कौतुक करताना थकत नसल्याचं दिसून आलं. तर काहींनी करीना-सैफची मुले ही बिघडलेली आहेत, असेह म्हटलं. एका युजरने लिहलं, 'त्यांची मुले कॅमेरा पाहताच अशा विचित्र गोष्टी का करायला लागतात?' आणखी एका यूजरने लिहिलं की, 'रितेश देशमुखच्या मुलांचे संस्कार बघा'. 

करीना कपूरने बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानशी १६ ऑक्टोबर २०१२ साली लग्न केलं होतं. लग्नाच्या ५ वर्षांनंतर त्यांना तैमुर झाला. सुरुवातीला तैमुरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर २०२१ मध्ये करीना पुन्हा आई झाली. तिने जहांगिरला जन्म दिला. सर्वजण त्याला जेह या नावाने हाक मारतात. सध्या जेहचा व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सैफने करिनाच्या आधी अमृता सिंगशी लग्न केले होते. अमृता आणि सैफ यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत.

Web Title: The netizens are slamming Kareena Kapoor Khan and husband Saif Ali Khan over Jeh DEETS INSIDE