प्रसिद्ध अभिनेत्रीने 'लालबागचा राजा'च्या दरबारात शंखनाद केला अन्...; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 10:56 IST2023-09-22T10:56:13+5:302023-09-22T10:56:40+5:30

नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या मुंबईतील 'लालबागचा राजा'च्या चरणी सेलिब्रिटी नतमस्तक होतात. नुकतंच प्रसिद्ध अभिनेत्रीने 'लालबागचा राजा'चं दर्शन घेतलं.

the kerala story fame adah sharma at lalbaugcha raja 2023 darshan video viral | प्रसिद्ध अभिनेत्रीने 'लालबागचा राजा'च्या दरबारात शंखनाद केला अन्...; व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीने 'लालबागचा राजा'च्या दरबारात शंखनाद केला अन्...; व्हिडिओ व्हायरल

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. सेलिब्रिटीही बाप्पाच्या भक्तीत दंग झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. घरी गणरायाचं आगमन करण्याबरोबरच कित्येक सेलिब्रिटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटीदेखील देतात. नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या मुंबईतील 'लालबागचा राजा'च्या चरणी सेलिब्रिटी नतमस्तक होतात. 

नुकतंच 'द केरला स्टोरी' फेम अदा शर्मानेलालबागचा राजाचं दर्शन घेतलं. यावेळी अदा पारंपरिक पोशाखात दिसून आली. 'लालबागचा राजा' चरणी अदा नतमस्तक झाली. यावेळी अदाने 'लालबागचा राजा'च्या दरबारात शंखनाद केला. अदाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत अदाने "आपण सर्व आनंदी होऊ या हीच प्रार्थना. लालबागचा राजा" असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

'लालबागचा राजा' दर्शनासाठी गेलेला विकी कौशल चाहत्यांच्या गर्दीत अडकला अन्...; व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचा किंग 'लालबागचा राजा' चरणी नतमस्तक, शाहरुख खान लेकासह बाप्पाच्या दर्शनाला

'द केरला स्टोरी' या चित्रपटातून अदा शर्मा प्रसिद्धीझोतात आली. तिने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. '१९२०', 'कमांडो', 'हसी तो फसी' अशा चित्रपटात अदा झळकली आहे. 

Web Title: the kerala story fame adah sharma at lalbaugcha raja 2023 darshan video viral