वादविवादानंतरही The Kerala Story ठरतोय सुपरहिट; दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 12:38 IST2023-05-07T12:35:12+5:302023-05-07T12:38:15+5:30
The kerala story: सुदिप्तो सेन दिग्दर्शिक 'द केरळ स्टोरी' या सिनेमाने पहिल्या दिवशी ७.५ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी हिच कमाई दुप्पट झाली आहे.

वादविवादानंतरही The Kerala Story ठरतोय सुपरहिट; दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई
The Kerala Story Box Office Collection day 2 : अनेक वादविवाद, विरोधानंतर द केरळ स्टोरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडू कसा प्रतिसाद मिळतोय याकडे समीक्षकांचं लक्ष वेधलं होतं. विशेष म्हणजे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरही तो वादात सापडला. या सिनेमात अनेक खोटे दावे करण्यात आहे. परंतु, अनेक संकट पार करत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजू लागला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु केली असून दुसऱ्या दिवशीही त्याने बक्कळ कमाई केली आहे.
सुदिप्तो सेन दिग्दर्शिक द केरळ स्टोरी या सिनेमाने पहिल्या दिवशी ७.५ कोटींची कमाई केली. त्यामुळे या सिनेमाने पहिल्याच दिवशी दणक्यात ओपनिंग केली. इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशीही हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या सिनेमाने दुसऱ्या दिवशी चक्क १२. ५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दरम्यान, सुदीप्तो सेन यांचा 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. हा सिनेमा लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा दावा करत अनेकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. या सिनेमात अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे.