The Kerala Story 2 Box Office: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी २' सिनेमाने पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:08 IST2026-02-28T12:06:45+5:302026-02-28T12:08:46+5:30

२०२३ मधील सर्वात वादग्रस्त आणि यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'द केरळ स्टोरी'चा सीक्वल 'द केरळ स्टोरी २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करत सर्वांना थक्क केले आहे.

the kerala story 2 box office collection day 1 vipul amritlal shah | The Kerala Story 2 Box Office: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी २' सिनेमाने पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई

The Kerala Story 2 Box Office: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी २' सिनेमाने पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई

२०२३ मधील सर्वात वादग्रस्त आणि यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'द केरळ स्टोरी'चा सीक्वल 'द केरळ स्टोरी २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करत सर्वांना थक्क केले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने शाहीद कपूरच्या 'ओ रोमियो' या चित्रपटाला पहिल्या दिवसाच्या कमाईत मागे टाकले आहे.

पहिल्या दिवशीची कमाई

'द केरळ स्टोरी २' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी केली आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी अंदाजे ३ ते ४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या बाजूला, शाहीद कपूरच्या 'ओ रोमियो' या बिग बजेट चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, 'द केरळ स्टोरी २' च्या आकडेवारीने त्याला मागे सारले आहे.

 पहिल्या भागाप्रमाणेच 'द केरळ स्टोरी २' देखील त्याच्या विषयामुळे वादात अडकला आहे. चित्रपटगृहांबाहेर काही ठिकाणी निषेध तर काही ठिकाणी जोरदार समर्थन पाहायला मिळाले. मात्र, या सर्व वादाचा फायदा चित्रपटाच्या गल्ल्यावर झाल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी केली असून 'वर्ड ऑफ माऊथ'मुळे चित्रपटाचा व्यवसाय वाढत आहे.

'द केरळ स्टोरी २'  या चित्रपटाच्या केंद्रस्थानी तीन मुलींच्या कथा आहेत, ज्यामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा दिसत आहेत. उल्का गुप्ताने यामध्ये 'सुरेखा' नावाच्या एका महत्त्वाकांक्षी खेळाडूची भूमिका साकारली आहे, तर ऐश्वर्या ओझा 'नेहा' या पात्रात दिसत आहे जी युपीएससी परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थिनी आहे. तसेच अदिती भाटियाने 'दिव्या' हे महत्त्वाचे पात्र साकारले असून या तिन्ही अभिनेत्रींच्या संघर्षावर या चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे.

शुक्रवारी मिळालेल्या या सकारात्मक सुरुवातीनंतर शनिवार आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता चित्रपट विश्लेषकांनी वर्तवली आहे. जर हाच वेग कायम राहिला, तर हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.

 

Web Title : विवादों के बीच 'द केरला स्टोरी 2' की दमदार शुरुआत, 'ओ रोमियो' को पछाड़ा

Web Summary : विवादों के बावजूद 'द केरला स्टोरी 2' ने बॉक्स ऑफिस पर शानदार शुरुआत की। पहले दिन अनुमानित 3-4 करोड़ रुपये कमाए, शाहिद कपूर की 'ओ रोमियो' को पीछे छोड़ा। फिल्म तीन महिलाओं की चुनौतियों को दर्शाती है, विरोध के बावजूद दर्शकों को आकर्षित किया।

Web Title : 'The Kerala Story 2' Opens Strong Amid Controversy, Surpassing 'O Romeo'

Web Summary : 'The Kerala Story 2' debuted with strong box office numbers despite controversy. Earning an estimated 3-4 crore on its first day, it surpassed Shahid Kapoor's 'O Romeo'. The film follows three women facing challenges, drawing audiences despite protests.