The Kashmir Files: Rishabh Pant ची गर्लफ्रेंड Isha Negi ने केली द कश्मीर फाइल्स वर कमेंट, Instagram वर लिहिला 'हा' मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 01:22 PM2022-03-16T13:22:48+5:302022-03-16T13:26:01+5:30

द काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे.

The Kashmir Files Must Watch Movie Indian Cricketer Rishabh Pant Girlfriend Isha Negi commented on Instagram | The Kashmir Files: Rishabh Pant ची गर्लफ्रेंड Isha Negi ने केली द कश्मीर फाइल्स वर कमेंट, Instagram वर लिहिला 'हा' मेसेज

The Kashmir Files: Rishabh Pant ची गर्लफ्रेंड Isha Negi ने केली द कश्मीर फाइल्स वर कमेंट, Instagram वर लिहिला 'हा' मेसेज

googlenewsNext

The Kashmir Files Rishabh Pant | काश्मिरी पंडितांवर बनवलेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटात पल्लवी जोशी (Pallavi Joshi), अनुपम खेर (Anupam Kher), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट समीक्षकांपासून ते सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय लोक या चित्रपटावर भाष्य करत आहेत. काश्मीर पंडितांवर झालेला अन्याय या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलंय. याच दरम्यान, टीम इंडियाचा विकेटकीपर आणि स्टार खेळाडू ऋषभ पंतची गर्लफ्रेंड इशा नेगी (Isha Negi) हिनेही या चित्रपटाबद्दल पोस्ट केली आहे.

रिषभ पंतची गर्लफ्रेंड इशा नेगी हिने नुकताच हा चित्रपट पाहिला. त्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर द काश्मीर फाइल्स चे एक पोस्टर शेअर केले. तसेच, त्या खाली Must Watch (नक्की पाहिलाच पाहिजे असा चित्रपट) असा खास संदेशही लिहिला. याशिवाय इशाने काही इन्स्टा स्टोरीज मध्येही द काश्मीर फाइल्सचे पोस्टर शेअर केले होते.

दरम्यान, ऋषभ पंत आणि ईशा नेगी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडेच, जेव्हा व्हॅलेंटाईन डे झाला, तेव्हा इशाने ऋषभ पंतसोबतची एक खास पोस्ट शेअर केली होती. याशिवाय इशाच्या वाढदिवशी ऋषभने देखील तिला 'हॅपी बर्थडे क्वीन' लिहून शुभेच्छा दिल्या होत्या.

काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे. तसेच, अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.

 

Web Title: The Kashmir Files Must Watch Movie Indian Cricketer Rishabh Pant Girlfriend Isha Negi commented on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.