The Kashmir Files: 'आई वडिलांच्या निधनावर रडलो नाही, पण...', विवेक अग्निहोत्रीला नेटकऱ्यांनी धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 06:27 PM2022-04-01T18:27:14+5:302022-04-01T18:27:21+5:30

The Kashmir Files:विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील एक सीन शेअर केला, पण व्हिडिओच्या कॅप्शनमुळे त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे.

The Kashmir Files: 'I did not cry over my father's death, but ...', Vivek Agnihotri trolled on social media | The Kashmir Files: 'आई वडिलांच्या निधनावर रडलो नाही, पण...', विवेक अग्निहोत्रीला नेटकऱ्यांनी धरले धारेवर

The Kashmir Files: 'आई वडिलांच्या निधनावर रडलो नाही, पण...', विवेक अग्निहोत्रीला नेटकऱ्यांनी धरले धारेवर

googlenewsNext

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला 'द कश्मीर फाइल्स' बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी करत आहे. चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटातील सीन्स पाहून अनेकांना रडू यायचे, याचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनाही एका सीनच्या शूटिंगदरम्यान आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते ढसाढसा रडले. पण, या सीनचा संबंध आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूशी जोडल्याने चांगलेच ट्रोल झाले.

विवेक अग्निहोत्रींनी 'द कश्मीर फाइल्स'शी संबंधित अनेक किस्से प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत, पण यावेळी त्यांचे शब्द पचवणे लोकांना कठीण जात आहे. त्यांनी एका विशिष्ट दृश्याचा बीटीएस(शुटींगचा व्हिडिओ) व्हिडिओ शेअर केला. अभिनेते अनुपम खेर यांच्या मृत्यूचा हा सीन आहे. हा सीन शूट करताना विवेक यांना रडू आवरले नव्हते. त्या सीनच्या शूटिंगदरम्यान ते ढसाढसा रडले होते आणि अनुपम खेर यांना मिठी मारली होती. हाच व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे, पण त्यासोबत दिलेले कॅप्शन नेटकऱ्यांना आवडले नाही.

सीनचा संबंध आई-वडिलांच्या मृत्यूशी जोडला
विवेकने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, '2004 मध्ये माझ्या आईचे निधन झाले तेव्हा मी रडलो नव्हतो. 2008 मध्ये माझे वडील वारले तेव्हाही मी रडलो नाही. पण, जेव्हा अनुपम खेरसोबत हा मृत्यूचा सीन शूट केला, तेव्हा मला रडू आवरता आले नाही. काश्मिरी हिंदू पालकांचे दुखः खूप तीव्र आहे. फक्त या सीनसाठी, 'द काश्मीर फाइल्स' पहा.'

नेटकऱ्यांनी विवेकला धरले धारेवर
विवेकच्या या ट्विटवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. एका युजरने लिहिले की, 'सीन खूपच छान होता, पण आई-वडिलांच्या मृत्यूवर तू रडला नाहीस, हे काही पचनी पडत नाही. मृतांचा अपमान करू नको.' मात्र, काही लोक त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसले. एकाने त्याचा बचाव केला की, 'काही वर्षांपूर्वी विवेक इतका संवेदनशील नसावा.' दरम्यान, विवेकच्या या ट्विटमुळे लोक त्याला असंवेदनशील म्हणत आहेत. 

Web Title: The Kashmir Files: 'I did not cry over my father's death, but ...', Vivek Agnihotri trolled on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.