The Kashmir Files: "...तर ती चप्पल मी अवॉर्ड म्हणून जपून ठेवली असती"; साकारलेल्या भूमिकेविषयी चिन्मय मांडलेकर व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:10 IST2022-04-06T19:08:11+5:302022-04-06T19:10:51+5:30
द कश्मीर फाईल्स रिलीज झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सोशल मीडियावर चिन्मयला खूप नेगेटिव्ह कमेंट्सचा सामना करावा लागला होता.

The Kashmir Files: "...तर ती चप्पल मी अवॉर्ड म्हणून जपून ठेवली असती"; साकारलेल्या भूमिकेविषयी चिन्मय मांडलेकर व्यक्त
विवेक अग्निहोत्री यांच्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड केली आहे.. कश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करतो. या चित्रपटात मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar)ने दहशतवादी बिट्टा कराटेची भूमिका साकारली आहे. लोकमत फिल्मशी बोलताना याबाबत चिन्मयने अनेक गोष्टींचा उलगडा केला.
सिनेमा रिलीज झाला त्या पहिल्या आठवड्यात सोशल मीडियावर चिन्मयला खूप नेगेटिव्ह कमेंट्सचा सामना करावा लागला होता. यावर बोलताना चिन्मय म्हणाला, त्या नेगेटीव्ह कमेंट्स माझ्यासाठी नव्हत्या. लोक आताही म्हणतात तुमचा खूप राग येतो. तुम्ही प्रत्यक्ष तेव्हा भेटला असता तर तुम्हाला मारलं असतं. एक बाईंने दिल्लीत चप्पल मारली स्क्रिनवर पण हे माझ्यासाठी नाही आहे त्या पात्रासाठी आहे. या जर भावना मी लोकांच्या मनात निर्माण करु शकलो तर याचा अर्थ मी माझ्या कामाबरोबर न्याय केलाय. मला ती चप्पल खरंच मिळाली असती तर मी अवॉर्ड म्हणून जपून ठेवली असती. याच्यापेक्षा मोठे अवॉर्ड नसू शकतं.
मला अनेकांनी विचारलं तुला ट्रोलिंगचा सामना करावा लागाला का?, तर मला अजिबात ट्रोलिंगचा सामना करावा लागला नाही. किंबहुना लोकांनी अभिमानाने माझे छत्रपतींच्या भूमिकेतील आणि बिट्टाच्या भूमिकेतील फोटो चाहत्यांनी व्हायरल करुन माझं कौतुक केलं. मला अभिनेता म्हणून या भूमिकेमुळे जास्त प्रेम मिळालं असं चिन्मय सांगतो.
चिन्मय व्यतिरिक्त या सिनेमात या अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी ही दिग्गज कलाकार मंडळीदेखील झळकली आहेत.