स्वतःची नक्कल पाहून सुनील ग्रोव्हरवर भडलकला सलमान खान? व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:16 IST2025-06-19T12:14:54+5:302025-06-19T12:16:19+5:30

स्वत:चीच मिमिक्री पाहून सलमान खानची काय होती प्रतिक्रिया?

The Great Indian Kapil Show Season 3 Sunil Grover Copies Salman Khan Video Goes Viral | स्वतःची नक्कल पाहून सुनील ग्रोव्हरवर भडलकला सलमान खान? व्हिडीओ व्हायरल

स्वतःची नक्कल पाहून सुनील ग्रोव्हरवर भडलकला सलमान खान? व्हिडीओ व्हायरल

The Great Indian Kapil Show Season 3: 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चे दोन सीझन प्रचंड यशस्वी ठरल्यानंतर आता या शोचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधीच्या दोन पर्वाप्रमाणेच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. नव्या सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. कारण या शोमध्ये भाईजान सलमान खान (Salman Khan) पहिला पाहुणा असणार आहे. 

पहिल्या या एपिसोडचा टीझर नुकताच रिलीज झाला. बॉलिवूडच्या भाईजानने त्याचा स्वॅग दाखवत सेटवर एन्ट्री घेतली. नेहमीप्रमाणे सुनील ग्रोव्हर सलमानची नक्कर करताना दिसला. यावेळी स्वतःची नक्कल पाहून सलमान खानची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या टीझरवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्यात. स्वतःची नक्कल पाहून सलमान खान सुनील ग्रोव्हरवर भडकणार की त्याचं कौतुक करणार हे एपिसोड पाहिल्यावर स्पष्ट होईल.  



कपिल शर्माचा शो २१ जूनपासून रात्री ८ वाजता फक्त नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या शोचा दुसरा सीझन २१ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू झाला होता आणि १४ डिसेंबर २०२४ रोजी समाप्त झाला. सुमारे सहा महिन्यांनंतर कपिल शर्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये बॉलिवूड, संगीत आणि क्रिकेटमधील काही दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. 

Web Title: The Great Indian Kapil Show Season 3 Sunil Grover Copies Salman Khan Video Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.