फोटोत वडिलांसोबत असलेली मुलगी एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री, तिची झाली ४ लग्नं, २ नवरे होते पाकिस्तानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 15:18 IST2022-09-17T15:17:50+5:302022-09-17T15:18:26+5:30
सध्या या अभिनेत्रीचा वडिलांसोबतचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

फोटोत वडिलांसोबत असलेली मुलगी एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री, तिची झाली ४ लग्नं, २ नवरे होते पाकिस्तानी
१९९१ मध्ये ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या सोबत 'हिना' (Henna Movie) चित्रपटात एक सुंदर अभिनेत्री दिसली होती, जिने आपल्या सौंदर्याने आणि निरागसतेने संपूर्ण भारतीयांची मने जिंकली होती. हिना या चित्रपटातून पदार्पण करून ही अभिनेत्री रातोरात लोकप्रिय ठरली होती. आजही तुम्हाला हिनाची प्रसिद्ध अभिनेत्री जेबा बख्तियार (Zeba Bakhtiar) आठवत असेल. जेबाची बॉलिवूडमधील कारकीर्द फार काळ टिकली नाही आणि ती व्यावसायिकपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत राहिली. जेबा बख्तियारचा तिच्या वडिलांसोबतचा बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये जेबा हसत आहे आणि तिच्या वडिलांकडे मोठ्या प्रेमाने पाहत आहे.
अभिनेत्री असण्यासोबतच जेबा बख्तियार मोठ्या कुटुंबातील आहे. जेबा ही पाकिस्तानातील प्रख्यात वकील आणि राजकारणी याह्या बख्तियार यांची मुलगी आहे. जेबा बख्तियार ही पाकिस्तानी वडिलांची आणि ब्रिटिश आईची मुलगी आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेबा बख्तियारने एकूण चार लग्नं केली आहेत, ज्यापैकी तिचे २ पती भारतीय आहेत. तिचे पहिले लग्न सलमान वलियानीशी, दुसरे लग्न जावेद जाफरीशी, तिसरे लग्न अदनान सामीशी आणि चौथे लग्न सोहेल खान लेघाडीशी झाले आहे.
विशेष म्हणजे हिना उर्फ जेबा बख्तियारला हिना या चित्रपटातून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. हिनासोबत डेब्यू केल्यानंतर जेबा आणखी काही चित्रपटांमध्ये दिसली, पण तिचे नाणे बॉलिवूडमध्ये फार चालू शकले नाही. जेबा बख्तियार मोहब्बत की आरजू, स्टंटमॅन, जय विक्रांता, सरगम, सू आणि चीफ साहब यासारख्या काही चित्रपटांमध्ये झळकली.