'द फॅमिली मॅन ३' साठी व्हा सज्ज! अभिनेत्री प्रियामणीनं केला शूटिंगबद्दल खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 12:45 IST2024-04-12T12:44:48+5:302024-04-12T12:45:32+5:30

अभिनेत्री प्रियामणीनं 'द फॅमिली मॅन' सिरीज संबंधित एक मोठी माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

The Family Man Season 3 Priyamani Opens Up About Shooting Schedule | 'द फॅमिली मॅन ३' साठी व्हा सज्ज! अभिनेत्री प्रियामणीनं केला शूटिंगबद्दल खुलासा

'द फॅमिली मॅन ३' साठी व्हा सज्ज! अभिनेत्री प्रियामणीनं केला शूटिंगबद्दल खुलासा

'द फॅमिली मॅन' ही सर्वात गाजलेली वेब सिरीज आहे. या सिरीजचे आधीचे दोन भाग प्रेक्षकांना फार आवडले. त्यातील मनोज यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. आता चाहत्यांना मनोज यांच्या 'द फॅमिली मॅन' या वेबसिरीजच्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे. नुकतेच अभिनेत्री प्रियामणीनं 'द फॅमिली मॅन' सिरीज संबंधित एक मोठी माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिनेत्री प्रियामणीनं नुकतेच दैनिक जागरणला बोलताना 'द फॅमिली मॅन ३' संदर्भात मोठं अपडेट दिलं. यावेळी बोलताना प्रियामणीनं तिसऱ्या सीझनचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचं सांगितलं. प्रियामणी म्हणाली, 'मनोज वाजपेयी यांच्यासोबत माझे खूप चांगले संबंध आहेत. आमची मैत्री झाली आहे. तिसऱ्या सीझनच्या सेटवर मी त्यांना भेटण्यास उत्सुक आहे'.

प्रियामणी म्हणाली, ''द फॅमिली मॅन' ही सीरिज माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण चेन्नई एक्सप्रेस चित्रपटानंतर या सीरिजनं मला हिंदी प्रेक्षकांसमोर आणलं.  या सीरिजनंतर प्रेक्षकांनी माझं जुनं कामही पाहिलं आहे, त्यांनी मला दुसरी संधी दिली'. प्रियामणीनं दिलेल्या या माहितीनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. सिरीजचा पुढचा भाग कधी येणार याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. त्यामुळे याबद्दल पुसटशी कल्पना देऊन प्रियामणीनं चाहत्यांना गोड गिफ्टच दिले आहे.

'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या सीझनमध्ये मनोज यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाचे अॅक्शन सीन्स चाहत्यांना प्रचंड आवडले. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या शेवटी आता पुढल्या सीझनमध्ये श्रीकांत तिसऱ्या कोरोनासारख्या महामारीचा सामना करताना दिसणार आहे, असे संकेत देण्यात आले होते. आता सीझन ३ मध्ये निर्माते प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येतात हे पाहणं खरोखरच मनोरंजक असेल.

Web Title: The Family Man Season 3 Priyamani Opens Up About Shooting Schedule