'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता शाहरुखची लाडकी लेक सुहानाचा 'द आर्चिज' सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 12:16 IST2023-12-07T12:14:32+5:302023-12-07T12:16:32+5:30

'द आर्चीज' या सिनेमाचं दिग्दर्शन जोया अख्तरने केलं आहे.

The Archies will drop on Netflix on Thursday, 7 December 2023 | 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता शाहरुखची लाडकी लेक सुहानाचा 'द आर्चिज' सिनेमा

'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता शाहरुखची लाडकी लेक सुहानाचा 'द आर्चिज' सिनेमा

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लेक सुहानाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत ती आता या इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावणार आहे. सुहानाचा 'द आर्चीज' हा सिनेमा आज (7 डिसेंबर 2023) रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यात सुहाना खान वेरोनिकाच्या भूमिकेत आहे.

'द आर्चीज' या सिनेमाचं दिग्दर्शन जोया अख्तरने केलं आहे. मैत्री,फ्रिडम, प्रेम आणि हार्ट ब्रेक हे सर्व या सिनेमात आहे. या चित्रपटात फक्त अभिनय नाही तर तिचे गायन कौशल्यही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'द आर्चीज'मधील 'जब तुम ना थी'  हे गाणे शाहरुख खान आणि गौरी खानच्या लाडक्या मुलीने स्वतःच्या आवाजात गायले आहे. यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

 'द आर्चीज' हा सिनेमा अमेरिकन लोकप्रिय कॉमिक्स 'द आर्चीज'वर आधारित असून 1960 च्या काळावर भाष्य करणारा आहे. या सिनेमात सुहाना खानसह  खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा, वेदांग रैना, मिहिर आहुजा, अदिती डॉट आणि युवराज मेंडा मुख्य भूमिकेत आहेत. 

सुहानाबद्दल बोलायचे झाल्यास, तिचे शालेय शिक्षण हे मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय पूर्ण केले आहे. तर इंग्लंडच्या आर्डलींग कॉलेजमधून तिने पुढचे शिक्षण घेतले.  न्यूयॉर्क विद्यापीठातून अभिनयाचा कोर्स केला आहे. अभिनय क्षेत्रासह सुहानाला शेती करण्याची आवड आहे. आलिबागमधील थाल गावातील जमीन तिने शेती करण्यासाठी विकत घेतली आहे.
 

Web Title: The Archies will drop on Netflix on Thursday, 7 December 2023