हॉरर सिनेमातून सर्वांना घाबरवलं, आता कुठे गेलीय ही अभिनेत्री?, रातोरात इंडस्ट्रीतून झाली गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:20 IST2025-01-29T17:19:36+5:302025-01-29T17:20:42+5:30

Veerana Movie : १९८८ साली रामसे ब्रदर्सने वीराना हा चित्रपट बनवला होता, ज्याच्या भयानक भुताटकीच्या कथेने सर्वांचा थरकाप उडवून दिला होता. चित्रपटाच्या प्रत्येक सीनमध्ये खूप सस्पेन्स होता, पण या चित्रपटात ज्याने सगळ्यात जास्त लक्ष वेधले ते या चित्रपटातील सुंदर भूताने

The actress who scared everyone with her horror movie, where has she gone now? She disappeared from the industry overnight. | हॉरर सिनेमातून सर्वांना घाबरवलं, आता कुठे गेलीय ही अभिनेत्री?, रातोरात इंडस्ट्रीतून झाली गायब

हॉरर सिनेमातून सर्वांना घाबरवलं, आता कुठे गेलीय ही अभिनेत्री?, रातोरात इंडस्ट्रीतून झाली गायब

बॉलिवूड हॉरर चित्रपटांमध्ये कॉमेडी किंवा बोल्डनेसचा टच नक्कीच असतो. १९८८ साली रामसे ब्रदर्सने वीराना (Veerana Movie ) हा चित्रपट बनवला होता, ज्याच्या भयानक भुताटकीच्या कथेने सर्वांचा थरकाप उडवून दिला होता. चित्रपटाच्या प्रत्येक सीनमध्ये खूप सस्पेन्स होता, पण या चित्रपटात ज्याने सगळ्यात जास्त लक्ष वेधले ते या चित्रपटातील सुंदर भूताने. ही भूमिका जॅस्मिन धुन्ना (Jasmine Dhunna) हिने साकारली होती, जिने रातोरात हिट चित्रपट दिले आणि नंतर इंडस्ट्रीतून गायब झाली.

जॅस्मिन धुन्ना सौंदर्यात कुणापेक्षा कमी नव्हती. या अभिनेत्रीने १९७९ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि पहिल्याच चित्रपटात तिने विनोद खन्ना यांच्यासोबत काम केले. दिग्दर्शक एन.डी. कोठारी यांनी १९७९ साली 'सरकारी मेहमान' हा चित्रपट प्रदर्शित केला होता, ज्यामध्ये दिग्दर्शक एका नवीन मुलीच्या शोधात होते आणि जॅस्मिन धुन्नाला शोधून हा शोध पूर्ण झाला. हा चित्रपट हिट झाला, पण जॅस्मिनला त्याचा फायदा झाला नाही. यानंतर ती तलाक या चित्रपटात दिसली, ज्यामध्ये शर्मिला टागोर मुख्य भूमिकेत होत्या. या दोन चित्रपटांमुळे जस्मिन धुन्ना यांच्या करिअरमध्ये फारसा फरक पडला नाही, परंतु १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या वीराना या चित्रपटाने सर्व काही बदलून टाकले. 

जॅस्मिनने दिले होते बोल्ड सीन्स

वीराना चित्रपटात जॅस्मिनने एका सुंदर भूताची भूमिका साकारली होती. जॅस्मिनने चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. तिच्या आंघोळीच्या दृश्यांनी सर्वांनाच चकित केले होते. जॅस्मिनचे बोल्ड फोटो आजही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 'वीराना' चित्रपटानंतर जॅस्मिनला हिंदी चित्रपटसृष्टीतील 'सर्वात सुंदर भूत' ही पदवीही मिळाली.


जॅस्मिनवर अंडरवर्ल्डची नजर होती का?
असे म्हटले जाते की, वीराना चित्रपटानंतर जॅस्मिनकडे प्रोजेक्ट्सची रांग लागली होती. तिच्याकडे एका पाठोपाठ एक चित्रपट येत होते, जे तिलाही करायचे होते. मात्र, तिच्यावर अंडरवर्ल्डची नजर पडली. असा दावा केला जात आहे की तिला अंडरवर्ल्डमधून कॉल येऊ लागले, त्यामुळे भीतीपोटी ती रातोरात इंडस्ट्रीतून गायब झाली. बऱ्याच रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की जॅस्मिन भारत सोडून अमेरिकेत स्थायिक झाली आहे आणि प्रसिद्धीपासून दूर आपले जीवन जगत आहे. याशिवाय रामसे ब्रदर्सने २०१७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, जॅस्मिन मुंबईत राहते. ती तिच्या आईच्या खूप जवळ होती म्हणून तिच्या मृत्यूनंतर ती अलिप्त राहू लागली. याच कारणामुळे ती फिल्मी जगापासून कायमची दुरावली.
 

Web Title: The actress who scared everyone with her horror movie, where has she gone now? She disappeared from the industry overnight.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.