म्हणून 'नोटबुक'च्या सेटवर दिग्दर्शकांनी केली होती हिरो-हिरोईनला बोलण्यास मनाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 16:00 IST2019-03-12T15:47:37+5:302019-03-12T16:00:57+5:30
जहीर इकबाल व प्रनूतन बहल यांचा 'नोटबुक' सिनेमा याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून प्रनूतन ही अभिनेता मोहनीश बहलची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

म्हणून 'नोटबुक'च्या सेटवर दिग्दर्शकांनी केली होती हिरो-हिरोईनला बोलण्यास मनाई
जहीर इकबाल व प्रनूतन बहल यांचा 'नोटबुक' सिनेमा याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक नितीन कक्कड यांनी सेटवर शूटिंग दरम्यान प्रनूतन आणि जहीर इकबाल एकमेकांशी बोलण्यास मनाई केली होती. यामागचे कारण होते सिनेमात दिग्दर्शकाला दोघे अनभिज्ञ असल्याचे दाखवयाचे होते.
कधीही एकमेकांना न भेटलेल्या पण प्रेमात पडलेल्या जोडप्याची कथा तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त. नोटबुक सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जहीर इकबाल व प्रनूतन बहल यांची केमिस्ट्री दिसली आहे. या सिनेमाचे अधिकाधिक चित्रीकरण हे काश्मीरमध्ये झाले आहे. नोटबुक' चित्रपटात २००७ सालातील कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तलवाच्या मध्यभागी असलेल्या एका शाळेवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. येत्या २९ मार्चला ‘नोटबुक’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या सिनेमातून प्रनूतन ही अभिनेता मोहनीश बहलची मुलगी आहे तर एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारी एकेकाळखी प्रख्यात अभिनेत्री नूतन यांची बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर तिच्या अपोझिट जहीर इकबाल दिसणार आहे. जहीरदेखील या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय.जहीरबद्दल बोलायचे झाले तर तो सलमानच्या मित्राचा मुलगा आहे. एका पार्टीत सलमानने जहीरला पाहिले आणि त्याला चित्रपट ऑफर केला.