'ठरलं तर मग' फेम अर्जुनचं ३६ व्या मजल्यावर नवीन घर, अभिनेता म्हणाला- "बाप्पाच्या कृपेनेच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:06 IST2025-08-28T12:03:26+5:302025-08-28T12:06:54+5:30

'ठरलं तर मग' मालिकेतील सर्वांचा लाडका अभिनेता अमित भानुशालीने ३६ व्या मजल्यावर नवीन घर घेत त्याचं आणि कुटुंबाचं घराचं स्वप्न पूर्ण केलंय. काय म्हणाला?

tharla tar mag actor amit bhanushali buy new home at 36th floor | 'ठरलं तर मग' फेम अर्जुनचं ३६ व्या मजल्यावर नवीन घर, अभिनेता म्हणाला- "बाप्पाच्या कृपेनेच..."

'ठरलं तर मग' फेम अर्जुनचं ३६ व्या मजल्यावर नवीन घर, अभिनेता म्हणाला- "बाप्पाच्या कृपेनेच..."

'ठरलं तर मग' मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. अशातच 'ठरलं तर मग' मालिकेतील अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशालीचं स्वप्न पूर्ण झालंय. अमितने थेट ३६ व्या मजल्यावर घर घेतलं आहे. गणेश चतुर्थीच्या आधीच अमित या नवीन घरात शिफ्ट झाला आहे. त्यामुळे अमितने बाप्पाचे आभार मानले आहेत. काय म्हणाला अमित?
बाप्पानेच केलं स्वप्न पूर्ण

अभिनेता अमित भानुशाली, त्याची पत्नी आणि त्याच्या शेजारील गृहस्थ या सगळ्यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला. अमितची बायको म्हणाली त्याप्रमाणे, गेल्या वर्षा एका मुलाखतीत अमित आणि त्याच्या पत्नीने बाप्पाजवळ नवीन घर होऊदे ही इच्छा प्रकट केली होती. आणि यंदा बाप्पाच्याच कृपेने अमित आणि त्याच्या पत्नीची ही इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे अमित आणि त्याचं संपूर्ण कुटुंब यावेळी आनंदात आहे. नवीन घरात वाजतगाजत अमित, त्याची पत्नी, त्यांचा लेक हृदान आणि संपूर्ण भानुशाली कुटुंब गणेशोत्सव साजरा करत आहेत.


बाप्पानेच आमची इच्छा पूर्ण केली, या शब्दात अमितने त्याच्या भावना व्यक्त केल्या. या नवीन घरात अमितचा लहान मुलगा हृदान आनंदात बागडताना, खेळताना दिसला. याशिवाय हृदानमुळे आमच्या सोसायटीत चैतन्य निर्माण झालंय, असं अमितचे शेजारी म्हणाले. अमित सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुनची भूमिका साकारत आहे. मालिकेतील अमित आणि जुई गडकरीच्या जोडीला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळत आहे. ही मालिका TRP मध्ये शिखरावर असते

Web Title: tharla tar mag actor amit bhanushali buy new home at 36th floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.