'थामा' ओटीटीवर कधी होणार प्रदर्शित? 'या' OTT प्लॅटफॉर्मवर येणार पाहता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 21:17 IST2025-10-23T21:05:56+5:302025-10-23T21:17:16+5:30
'थामा' ओटीटीवर कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या...

'थामा' ओटीटीवर कधी होणार प्रदर्शित? 'या' OTT प्लॅटफॉर्मवर येणार पाहता
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित हॉरर-कॉमेडी चित्रपट 'थामा' सध्या मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. दरम्यान, 'थामा'च्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
हिंदी चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर लवकरच ओटीटीवर येतात. काही चित्रपट एका महिन्यात येतात, तर काहींना दोन महिने लागतात. जर तुम्ही 'थामा'च्या ओटीटी रिलीजची वाट पाहत असाल, तर तुम्हाला जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही.
आयुषमान खुराना, रश्मिका मंदाना, आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेला 'थामा' हा चित्रपट डिसेंबरच्या अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या आसपास (जानेवारी २०२६) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 'थामा' चित्रपटाचे स्ट्रीमिंग हक्क Amazon Prime Video ने घेतले आहेत. त्यामुळे याच प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट स्ट्रीम होण्याची दाट शक्यता आहे.