Thalapathy Vijay च्या 'बीस्ट' सिनेमावर कुवेतमध्ये बंदी, जाणून घ्या काय आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 11:46 IST2022-04-06T11:44:03+5:302022-04-06T11:46:15+5:30

Beast : थलपति विजयचा (Thalapathy Vijay) सिनेमा 'बीस्ट' १३ एप्रिल २०२२ ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. कुवेतमध्ये हा सिनेमा बॅन करण्यात आल्याने येथील प्रेक्षकांना आता दुसरीकडे जाऊन हा सिनेमा बघावा लागणार आहे.

Thalapathy Vijay movie Beast ban in Kuwait, Know the reason | Thalapathy Vijay च्या 'बीस्ट' सिनेमावर कुवेतमध्ये बंदी, जाणून घ्या काय आहे कारण!

Thalapathy Vijay च्या 'बीस्ट' सिनेमावर कुवेतमध्ये बंदी, जाणून घ्या काय आहे कारण!

साऊथचा सुपरस्टार थलपति विजय (Thalapathy Vijay) चा 'बीस्ट' (Beast) सिनेमा पुढील आठवड्यात रिलीज होणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरने सगळीकडे धमाका केला. अनेक रेकॉर्ड्स कायम केले. अशात आता या सिनेमासंबंधी वादही समोर येत आहे. विजयच्या या सिनेमावर कुवैतमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या सिनेमात इस्लामिक दहशतवाद दाखवला आहे. जो कुवेतला रूचला नाही. अशात कुवेत सरकारने या सिनेमावर बंदी घातली आहे. 

थलपति विजयचा सिनेमा 'बीस्ट' १३ एप्रिल २०२२ ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. कुवेतमध्ये हा सिनेमा बॅन करण्यात आल्याने येथील प्रेक्षकांना आता दुसरीकडे जाऊन हा सिनेमा बघावा लागणार आहे. ताज्या रिपोर्ट्सनुसार, कुवेत सरकारने सिनेमावर रिलीजआधीच बंधी घातली आहे. असं सांगितलं जात आहे की, सिनेमात दहशतवादाचा मुद्दा आहे. जे बंदीचं कारण ठरला. काही सीन्समध्ये इस्लामिक दहशतवाद दाखवण्यात आला आहे.

याआधीही कुवेतमध्ये साऊथच्या काही सिनेमांवर बंदी घालण्यात आली होती. 'कुरूप' आणि 'विष्णु विशाल' या दोन्ही सिनेमांवर बंदी घालण्यात आली होती, ज्यात दहशतवाद दाखवण्यात आला होता. ज्यात अरब देशांना दहशतवादाला आश्रय देणारे देश म्हटलं होतं. कुवेत त्यापैकी एक आहे. 

'बीस्ट' एक हॉस्टेज थ्रीलर सिनेमा आहे. यात थलापति विजय एका रॉ ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार  आहे. त्याचं नाव आहे वीरा राघवन. सिनेमाची निर्मीती सन पिक्चर्सने केली  आहे. तर यात विजयसोबत पूजा हेगडे, सेल्वाराघवन, योगी बाबू यांच्या भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमारने केलं आहे.
 

Web Title: Thalapathy Vijay movie Beast ban in Kuwait, Know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.