‘दहा लाख मांगे दहेजवा जीएसटी जोडके’ हे भोजपुरी गीत होतेय वाºयासारखे व्हायरल, तुम्हीही पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 21:38 IST2018-02-18T16:08:34+5:302018-02-18T21:38:34+5:30
सध्या भोजपुरी चित्रपटांची जबरदस्त क्रेझ बघावयास मिळत आहे. सध्या ‘दहा लाख मांगे दहेजवा जीएसटी जोडके’ हे भोजपुरी गीत सोशल मीडियावर वाºयासारखे व्हायरल होत आहे.

‘दहा लाख मांगे दहेजवा जीएसटी जोडके’ हे भोजपुरी गीत होतेय वाºयासारखे व्हायरल, तुम्हीही पाहा!
ह ळी हा सण जवळ येताच दरवर्षी यासंबंधीचे गाणी समोर येत असतात. मात्र यावर्षी एक अतिशय हटके असे गाणे समोर आले असून, सोशल मीडियावर ते वाºयासारखे व्हायरल होत आहे. हे गीत भोजपुरी चित्रपटातील सुपरस्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव आणि आम्रपाली दुबे यांचे आहे. हे गीत व्हायरल होण्याचे कारण त्याची थीम आहे. होय, अतिशय मजेशीर पद्धतीने रचलेल्या या गाण्याचे बॅकग्राउंड सद्य:स्थितीवर आधारित आहे. गाण्याचे बोल ‘दहा लाख मांगे दहेजवा जीएसटी जोडके’ असे असल्याने अनेकांच्या ते पसंतीस येत आहे.
वास्तविक हे गीत दहेज म्हणजेच हुंडा या सामाजिक कुप्रथे विरोधात आहे. या गाण्याचे बोल आणि त्याचे संगीत थिरकायला भाग पाडतात. शिवाय या गाण्याचे पिक्चरायजेशनही जबरदस्त आहे. मुलाचा बाप मुलीच्या वडिलांना हुंडा आणि जीएसटी मिळून दहा लाख रूपयांची मागणी करतो. त्यानंतर मुलीचा बाप जेव्हा ही बाब मुलीला सांगतो तेव्हा मुलगी याचा जाब विचारण्यासाठी मुलाकडे जाते. त्यानंतर या मजेशीर अन् तेवढ्याच अर्थपूर्ण गाण्यास सुरुवात होते.
वास्तविक भोजपुरी गाणी आणि त्याचा प्रेक्षकवर्ग मर्यादित आहे. परंतु या गाण्याने सर्वच स्तरातील प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. प्रत्येक भाषेतील प्रेक्षक हे गीत ऐकत आणि बघत आहे. हे गीत भोजपुरी गायक आणि अभिनेता निरहुआसोबत प्रियंका सिंग हिने गायिले आहे. गाण्याचे बोल प्यारे लाल यादव याने लिहिले आहेत.