तापसी शिकतेयं ‘मार्शल आर्ट’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 16:38 IST2016-08-27T11:08:52+5:302016-08-27T16:38:52+5:30
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच नीरज पांडे निर्मित ‘मीरा’ या चित्रपटात दिसणार आहे आणि या चित्रपटासाठी तापसी मार्शल आर्टचे ...

तापसी शिकतेयं ‘मार्शल आर्ट’!
ब लिवूड अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच नीरज पांडे निर्मित ‘मीरा’ या चित्रपटात दिसणार आहे आणि या चित्रपटासाठी तापसी मार्शल आर्टचे ट्रेनिंग घेत आहे. यापूर्वी नीरज पांडे यांच्या ‘बेबी’ चित्रपटात तापसी दिसली होती. आता तिची ‘मीरा’मध्ये वर्णी लागली आहे. शिवम नायर या चित्रपटाचे दिग्दर्शक असतील. निश्चितपणे संपूर्ण चित्रपटाची कथा मीरा या व्यक्तिरेखेच्या अवतीभवती फिरणारी आहे. ही भूमिका तापसी साकारणार आहे. हा चित्रपट म्हणजे एका विशेष एजंटची कथा आहे. या भूमिकेसाठी तापसीचे जबरदस्त स्टंट दिसणार आहे. त्यामुळे सध्या ती मार्शल आर्टचे धडे गिरवत आहे. अर्थात इतकी महत्त्वपूर्ण भूमिका पदरात पडल्याने तापसी जाम आनंदात आहे. करिअरच्या सुुरुवातीला मला इतकी महत्त्वपूर्ण भूमिका मिळतेयं, याचा मला आनंद आहे, असे तापसी सांगत सुटलीयं, ते त्यामुळेच!!