तारा सुतारीयाने बॉयफ्रेंडबरोबर केलं ब्रेकअप! आता कार्तिक आर्यनसोबत जोडलं जातंय नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 10:09 IST2023-11-07T10:08:26+5:302023-11-07T10:09:27+5:30

बॉलिवूडमध्ये नाती जमायला आणि तुटायला वेळ लागत नाही. तूर्तास बी-टाऊनमध्ये पुन्हा एका ब्रेकअपची चर्चा रंगली आहे.

Tara sutaria confirms breakup with aadar jain amid reports of dating kartik aryan | तारा सुतारीयाने बॉयफ्रेंडबरोबर केलं ब्रेकअप! आता कार्तिक आर्यनसोबत जोडलं जातंय नाव

तारा सुतारीयाने बॉयफ्रेंडबरोबर केलं ब्रेकअप! आता कार्तिक आर्यनसोबत जोडलं जातंय नाव

बॉलिवूडमध्ये नाती जमायला आणि तुटायला वेळ लागत नाही.  अभिनेत्री तारा सुतारिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्याला घेऊन चर्चेत आहे. तारा सुतारियाने आदर जैनसोबत झालेल्या ब्रेकअपवर मौन सोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ताराचे नाव अभिनेता कार्तिक आर्यनसोबत जोडले जात आहे. या अफवांच्या दरम्यान ती म्हणाला, 'मी कोणत्याही नात्यात नाही.' तारा आणि आदर अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे.  आदरच्या फॅमिली फोटोंमध्ये तारा दिसायची.

 आदर जैन हा राज कपूर यांचा नातू आहे. राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा तो मुलगा आहे. रणबीर कपूर, करीना आणि करिश्मा कपूर यांचा तो चुलत भाऊ आहे.  आदर आणि तारा सुतारिया अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते त्यानंतर २०२०मध्ये त्यांनी आपलं नातं अधिकृत केलं होतं. तारा व आदर सर्रास एकत्र दिसायचे. अगदी कपूर कुटुंबाच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये आदरसोबत तारा दिसायची. अगदी आलिया व रणबीरच्या लग्नातही ताराने हजेरी लावली होती. त्यामुळे हे नातं लग्नापर्यंत पोहोचेल, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण झालं भलतंच. तारा भविष्यात कपूर कुटुंबाची सून होणार, अशी चर्चा असतानाच तारा व आदरचं ब्रेकअप झालं.
 
'एक व्हिलन रिटर्न्स' (2022) या चित्रपटात शेवटची दिसलेली. नुकतेच ताराने News18 ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की ती कोणासोबत ही रिलेशनशिपमध्ये नाही.

आता 27 वर्षीय ताराचे नाव 32 वर्षीय कार्तिक आर्यनसोबत जोडले जाते आहे. दोघेही मेहबूब स्टुडिओबाहेर एकत्र दिसले होते. हे दोघेही सिक्रेट डेटवर गेल्याचे बोलले जात होते. मात्र ताराने कार्तिक आर्यनसोबच्या डेटिंग रुमर्सनाही पूर्णविराम लावला आहे.

Web Title: Tara sutaria confirms breakup with aadar jain amid reports of dating kartik aryan