एपी ढिल्लोंसोबतच्या 'त्या' व्हिडीओवर तारा सुतारियानं सोडलं मौन, वीर पहाडिया कमेंट करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:20 IST2025-12-30T12:17:02+5:302025-12-30T12:20:20+5:30
एपी ढिल्लोंनं तारा सुतारियाचा बाॅयफ्रेंडसमोरच किस घेतला? 'त्या' व्हिडीओवर अभिनेत्रीनं मौन सोडलं

एपी ढिल्लोंसोबतच्या 'त्या' व्हिडीओवर तारा सुतारियानं सोडलं मौन, वीर पहाडिया कमेंट करत म्हणाला...
Tara Sutaria Ap Dhillon Concert Video Controversy : अभिनेत्री तारा सुतारिया सध्या चर्चेत आहे. अलिकडेच तारा ही मुंबईमध्ये लोकप्रिय पंजाबी गायक एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमध्ये बॉयफ्रेंड वीर पहाडियासोबत पोहोचली. अभिनेत्रीने केवळ कॉन्सर्टचा आनंद घेतला नाही तर एपी ढिल्लोंसोबत स्टेज शेअर केला. दोघांनी त्यांचे "थोडी सी दारू" हे गाणे गायले. यावेळी स्टेजवर तारा आणि एपी ढिल्लों या दोघांमध्ये अनोखी केमिस्ट्री बघायला मिळाली. पण, त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये उभा असलेला ताराचा बॉयफ्रेंड वीरची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली. एपी ढिल्लों आणि तारा यांच्यातील जवळीक पाहून वीर नाराज झाला असून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या पसरल्या. तसेच ताराला ट्रोलही केलं गेलं. यावर आता अभिनेत्रीनं मौन सोडलं आहे.
ताराने कॉन्सर्टमधील स्वतःचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'पूर्ण उत्साह आणि अभिमानाने, आपण सर्व एकत्र आहोत. एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टची काय अफलातून रात्र होती! जबरदस्त!!!. मुंबईकरांनो, आमच्या गाण्यावर तुम्ही दिलेल्या अफाट प्रेमाबद्दल धन्यवाद आणि आम्हाला आशा आहे की, आपण एकत्र आणखी कॉन्सर्ट करू आणि सुंदर आठवणींचा हा प्रवास असाच सुरू राहो".
व्हायरल व्हिडीओ आणि ब्रेकअपच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना तारा सुतारियाने पुढे लिहिलं, "खोटेपणा, एडिटिंग आणि पीआर हे आम्हाला अजिबात हादरवू शकत नाहीत. शेवटी प्रेम आणि सत्याचा नेहमीच विजय हो. त्यामुळे टोमणे मारणाऱ्यांवरच हा विनोद उलटतो".
अभिनेत्रीच्या या पोस्टवर कमेंट करत वीरनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने कमेंटमध्ये स्पष्ट केले की, "माझ्या प्रतिक्रियेचं जे फुटेज दाखवलं गेलं, ते प्रत्यक्षात 'थोडी सी दारू' या गाण्यादरम्यानचं नाही तर दुसऱ्या गाण्यादरम्यानचं होतं. जोकर्स..." असं म्हणतं वीरनं तो नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच ताराच्या या पोस्टवर ताराच्या पोस्टवर एपी ढिल्लों याने "क्वीन" अशी कमेंट करत तिचं समर्थन केलं.