एकत्र रोमाँटिक व्हॅकेशनवर गेलेत तारा सुतारिया आणि आदर जैन?
By गीतांजली | Updated: November 18, 2020 13:22 IST2020-11-18T12:58:50+5:302020-11-18T13:22:11+5:30
तारा सुतारिया आणि अदार जैन त्यांच्या अफेअरला घेऊन नेहमी चर्चेत असतात.

एकत्र रोमाँटिक व्हॅकेशनवर गेलेत तारा सुतारिया आणि आदर जैन?
तारा सुतारिया आणि अदार जैन त्यांच्या अफेअरला घेऊन नेहमी चर्चेत असतात. तारा आणि आदरला अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. तारा सुतारिया कपूर आणि जैन कुटुंबीयांच्या फार क्लोज आहे. अनेकवेळा ती घरगुती कार्यक्रमांच्यावेळी आवर्जुन उपस्थि असते. तारा आणि आदर मालदीवला व्हॅकेशनसाठी एकत्र गेले असल्याची माहिती मिळतेय.
आदर जैनची इन्स्टास्टोरी
अलीकडेच तारा सुतारिया आणि आदर जैनने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालदीवमधले फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं. तारा आणि आदरने वेगवेगळे फोटो शेअर केले आहे. रिपोर्टनुसार आदर जैन लवकरच गर्लफ्रेंड तारा सुतारियासोबत सात फेरे घेणार आहे. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप सीरियस आहेत आणि ते लवकरच लग्नबेडीत अडकण्याची शक्यता आहे.
तारा सुतारियाची इन्स्टास्टोरी
आदरचे करियर अद्याप सुरू झाले नाही आहे. तर ताराने २०१९ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आताच तिने तिच्या करिअरला सुरूवात केली आहे. मात्र त्यांच्या लग्नासाठी काहीही अडचण नाही. आता ते दोघे लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. तारा सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत 'आरएक्स 100' या तमिळ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. तसेच टायगर श्रॉफसोबत 'हिरोपंती 2'मध्येही झळकणार आहे.
'