तापसी पन्नूने अनुराग बासूच्या ह्या सिनेमात काम करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 21:00 IST2019-01-10T21:00:00+5:302019-01-10T21:00:00+5:30

दिग्दर्शक अनुराग बासू त्याचा सुपरहिट ठरलेला 'लाइफ इन मेट्रो' चित्रपटाचा सीक्वल बनवणार असून त्यात 'पिंक' फेम अभिनेत्री तापसी पन्नूची निवड केली असल्याची चर्चा होती. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तापसीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.

Tapsee Pannu refuses to work in Anurag Basu's film | तापसी पन्नूने अनुराग बासूच्या ह्या सिनेमात काम करण्यास दिला नकार

तापसी पन्नूने अनुराग बासूच्या ह्या सिनेमात काम करण्यास दिला नकार

ठळक मुद्देतापसी पन्नूने 'लाइफ इन मेट्रो'च्या सीक्वलमध्ये काम करण्यास दिला नकारतापसी वुमनिया चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी

दिग्दर्शक अनुराग बासू त्याचा सुपरहिट ठरलेला 'लाइफ इन मेट्रो' चित्रपटाचा सीक्वल बनवणार असून त्यात 'पिंक' फेम अभिनेत्री तापसी पन्नूची निवड केली असल्याची चर्चा होती. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तापसीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. या चित्रपटात राजकुमार राव, फातिमा सना शेख, आदित्य रॉय-कपूर व अभिषेक बच्चनला कास्ट करणार आहेत अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे.

मेट्रो चित्रपटाच्या सीक्वलमध्ये आदित्य रॉय कपूरच्या अपोझिट तापसी पन्नूला कास्ट करण्यात आले होते. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तापसी या चित्रपटाचा भाग नसणार आहे. तापसीने या चित्रपटाच्या शूटिंगकरिता अनुराग यांच्याकडे तारखांचा तपशील मागितला होता, परंतु अनुराग बासू याविषयी निश्‍चित काही सांगू शकले नाहीत. त्यामुळे त्यानंतर तापसीने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. तापसीने यापूर्वीच आपला आगामी चित्रपट वूमनियाच्या चित्रीकरणाला सुरू केले आहे.


तापसीच्या कामाबद्दल सांगायचे तर, सध्या ती ‘मंगल मिशन’ या चित्रपटाच्या तयारीत बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, शरमन जोशी असे अनेक दिग्गज स्टार आहेत.
2013मध्ये तापसीने ‘चश्मेबहाद्दूर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तापसीने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. तापसीने  पिंक , बेबी ,  नाम शबाना , जुड़वा 2 , सूरमा ,  द गाजी अटॅक यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. आता तर तिने बिझनेसकडेही लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

बॅडमिंटन प्रिमिअर लीगसाठी तिने पुण्याची टीम विकत घेतली आहे.

सध्या सुरू असलेल्या चौथ्या सीझनमध्ये तिच्या टीमला “चीअर अप’ करण्यात तिला विशेष आनंद आहे. 

Web Title: Tapsee Pannu refuses to work in Anurag Basu's film