​तापसी पन्नू का म्हणतेय स्वतःला वाईट अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 16:56 IST2017-10-02T11:26:43+5:302017-10-02T16:56:43+5:30

तापसी पन्नूने चष्मे बहाद्दूर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये काम ...

Tapasya says, Pannau is herself a bad actress | ​तापसी पन्नू का म्हणतेय स्वतःला वाईट अभिनेत्री

​तापसी पन्नू का म्हणतेय स्वतःला वाईट अभिनेत्री

पसी पन्नूने चष्मे बहाद्दूर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. दक्षिणेत मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तापसी बॉलिवूडकडे वळली. पण तिच्या सुरुवातीच्या चित्रपटांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. बेबी, पिंक या चित्रपटातील भूमिकींमुळे ती चांगलीच नावारूपाला आली. द गाझी अटॅक, नाम शबाना यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे तर प्रचंड कौतुक झाले होते. आता ती जुडवा 2 या चित्रपटात झळकत आहे. तिची ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ती एक चांगली अभिनेत्री असल्याचे सध्या सगळ्यांचेच म्हणणे आहे. सुरुवातीला तिच्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले होते. पण पिंक या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे ती एक चांगली अभिनेत्री असल्याचे सिद्ध केले. आज चांगल्या अभिनेत्रीमध्ये तिची गणना केली जाते. पण तापसी स्वतः बद्दल, स्वतःच्या अभिनयाबाबत काय विचार करते हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. मी एक चांगली अभिनेत्री नाहीये. मी एक घटीया अभिनेत्री असल्याचे तापसी पन्नूचे म्हणणे आहे. 
हो, हे खरे आहे. तापसीच्या मते ती चांगली अभिनेत्री नाहीये. तापसीने झुम टिव्हीवरील यार मेरा सुपरस्टार २ या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले. या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले आहे की, मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी ऑडिशन्स दिल्या आहेत आणि त्यातील अनेक ऑडिशन्समध्ये मी नापास झाले आहे. माझ्यासमोर कॅमेरा ठेवल्यावर तसेच समोर अनेक लाइट्स असल्यावर मी अभिनय करू शकत नव्हते. ऑडिशनच्या वेळी समोर कॅमेरा असायचा आणि खूप सारे लाइटिंग असायचे आणि मला  सांगितले जायचे की, तू आता अभिनय कर... तर अशाप्रकारचा अभिनय मला करता यायचाच नाही आणि त्यामुळे मी कोणत्याच ऑडिशनमध्ये पास होत नव्हते. मी चांगला अभिनय करूच शकत नव्हते. 
ऑडिशनमध्ये चांगला अभिनय करू न शकणारी तापसी चित्रपटातील आपल्या अभिनयाने अनेक लोकांचे मन जिंकत आहे. त्यामुळे तिने स्वतःला वाईट अभिनेत्री म्हणणे कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा. 

Also Read : तापसी पन्नू म्हणते, किसींग सीन्स इतकी टीका का?

Web Title: Tapasya says, Pannau is herself a bad actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.