तापसी पन्नू म्हणते, वास्तव जगाशी जोडलेले राहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 20:27 IST2017-02-17T14:57:51+5:302017-02-17T20:27:51+5:30
आपल्या अभिनयाने ओळखली जाणारी तापसी पन्नू म्हणते,वास्तव जगाशी जोडले जाणे गरजेचे आहे. ती म्हणते, जर तुम्ही नेहमीच सिनेमा जगताशी ...

तापसी पन्नू म्हणते, वास्तव जगाशी जोडलेले राहा!
आ ल्या अभिनयाने ओळखली जाणारी तापसी पन्नू म्हणते,वास्तव जगाशी जोडले जाणे गरजेचे आहे. ती म्हणते, जर तुम्ही नेहमीच सिनेमा जगताशी संबंधित लोकांसोबत राहात असाल तर बाहेर जगात काय चालले आहे, हे तुम्हाला कसे कळणार? तुम्ही ज्यांची कथा मोठ्या पडद्यावर सांगणार आहात, त्यांच्यासंदर्भात तुम्ही कसे जाणून घेणार आहात?
आणखी वाचा: तापसी पन्नूचा अॅक्शन अवतार ह्यनाम शबानाह्णचा ट्रेलर रिलीज
दिल्लीची रहिवासी असणारी तापसी पीटीआयशी बोलताना म्हणाली, मी काम करताना नेहमीच उत्सुक असते. माझे किती मित्र आहेत, हे मी अगदी मोजून सांगू शकते. याचे कारण म्हणजे मी नेहमीच त्यांच्या संपर्कात असते. ते लोक मला सहज भेटू शकतात.’
![]()
तापसीच्या अनुसार दिल्लीच्या मुलींविषयी कायम चुकीचे सांगितले जाते. त्या कशा कपडे घालतात, बोलतात, लोकांशी कशा वागतात याबाबत भ्रम तयार झाला आहे. आम्ही लोकांसोबत मिसळून वागतो. रस्त्यावरही अगदी सहज फिरतो. डीटीसीच्या बसमधून अथवा रिक्षांमधून प्रवास करतो. आम्हाला जे काही वाटते, ते सारे करतो.
चित्रपटसृष्टीच्या बाहेरून आल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. तुम्ही जेव्हा बाहेरून आलेले असता, त्यावेळी तुम्हाला शूजित सरकार, नीरज पांडे यांच्यासारखे लोक भेटतात. तुम्हाला चांगल्या भूमिका मिळू शकतात.
तापसीने शूजित सरकार दिग्दर्शित ‘पिंक’ या चित्रपटात काम केले होते. तिचे रनिंग शादी आणि द गाझी अटॅक हे चित्रपट आज प्रदर्शित झाले. २०१५ साली तिने बेबी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.