'तन्वी द ग्रेट'ला मेडिकल आणि ऑटिझमच्या जगातून मिळतंय स्टॅंडिंग ओव्हेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 20:17 IST2025-07-22T20:17:12+5:302025-07-22T20:17:32+5:30

Tanvi the Great Movie : अनुपम खेर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'तन्वी द ग्रेट' या चित्रपटानं रसिकांच्या मनावर खोल ठसा उमटवला आहे. पण सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ही फिल्म मेडिकल आणि न्युरोडायव्हर्सिटी समुदायाकडूनही खूप प्रेमाने आणि मानाने स्वीकारली गेली आहे.

'Tanvi the Great' gets a standing ovation from the medical and autism world | 'तन्वी द ग्रेट'ला मेडिकल आणि ऑटिझमच्या जगातून मिळतंय स्टॅंडिंग ओव्हेशन

'तन्वी द ग्रेट'ला मेडिकल आणि ऑटिझमच्या जगातून मिळतंय स्टॅंडिंग ओव्हेशन

अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'तन्वी द ग्रेट' (Tanvi The Great) या चित्रपटानं रसिकांच्या मनावर खोल ठसा उमटवला आहे. पण सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ही फिल्म मेडिकल आणि न्युरोडायव्हर्सिटी समुदायाकडूनही खूप प्रेमाने आणि मानाने स्वीकारली गेली आहे. ऑटिझमसारखा विषय ज्या प्रकारे हृदयस्पर्शी रीतीने दाखवला आहे, त्यानं सगळ्यांची मनं जिंकली आहेत. या सिनेमावर प्रसिद्ध न्युरो एक्स्पर्ट, एज्युकेटर आणि अवॉर्ड-विनिंग लेखक डॉ. शुवेन्दु सेन यांनी ब्लॉग लिहिला आहे.

डॉ. शुवेन्दु सेन यांनी म्हटले की, "तन्वी द ग्रेट माझ्या मनाला भिडली. जोपर्यंत कोणत्याही व्याधीकडे दिग्दर्शकाची किंवा लेखकाची सन्मानाची दृष्टी नसेल, तोपर्यंत त्यावर आधारित कोणताही चित्रपट महत्त्वाचा संदेश देऊ शकत नाही. या फिल्मनं एका वेगळ्या मुलीची गोष्ट अत्यंत संवेदनशीलपणे उभी केली आहे. ऑटिझमसारख्या नाजूक विषयाला खोलवर समजून घेतलं गेलं आहे आणि हे फक्त अनुपम खेर यांच्यासारख्या कलाकाराच्या दिग्दर्शनामुळेच शक्य झालं आहे."

"हा सिनेमा एक नवीन आशा घेऊन आला आहे."
अनेक डॉक्टर, थेरपिस्ट आणि पालकवर्गाचं म्हणणं आहे की या चित्रपटात कुठलीही अतिशयोक्ती नाही, ना काही घिसेपिटलेले फॉर्म्युले वापरले गेले आहेत. सगळ्या गोष्टी नीट, सरळ आणि मनापासून दाखवल्या आहेत. ऑटिझमचा प्रत्येक पैलू समजून घेतलेला आहे. वर्ल्ड बायो केअर्स हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रेसिडेंट डॉ. जसविंदर सिंग यांनी जालंधरमध्ये एक खास स्क्रिनिंग आयोजित केली, जिथे ऑटिझम आणि स्पीच डिसऑर्डर्ससाठी संघर्ष करणाऱ्या मुलांना हा चित्रपट दाखवण्यात आला. ते म्हणाले,  "हजारो मुले जी ऑटिझम स्पेक्ट्रम, स्पीच डिफिकल्टीज, एडीएचडीसारख्या अडचणींना सामोरी जात आहेत. त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जर बदलला, तर त्यांच्यात असंख्य गुण आहेत. फक्त योग्य मार्गदर्शन आणि एक संधी यांची गरज आहे. हा सिनेमा एक नवीन आशा घेऊन आला आहे."

अनुपम खेर म्हणाले...
अनुपम खेर म्हणाले, "ज्या प्रेमाने लोक सिनेमाला स्वीकारत आहेत, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. पण खरं बक्षीस म्हणजे मेडिकल फ्रॅटर्निटी आणि ऑटिझम-संबंधित कुटुंबांकडून आलेला प्रतिसाद तेही सिनेमाशी मनापासून जोडले गेले आहेत. हेच कनेक्शन आमच्यासाठी सर्वोच्च आहे."

सिनेमाविषयी
'तन्वी द ग्रेट' ही एका ऑटिस्टिक मुलीची गोष्ट आहे जी आपल्या स्वर्गीय वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सियाचेन पर्यंत पोहोचून तिरंगा फडकवायला निघते. खऱ्या घटनांवर आधारित या फिल्ममध्ये शुभांगी दत्त मुख्य भूमिकेत आहेत, त्यांच्यासोबत पल्लवी जोशी, बोमन इराणी, जॅकी श्रॉफ आणि अरविंद स्वामी देखील आहेत. दिग्दर्शन अनुपम खेर यांचं असून संगीत दिलं आहे ऑस्कर विजेते एम. एम. कीरवाणी यांनी. हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Web Title: 'Tanvi the Great' gets a standing ovation from the medical and autism world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.