तनुश्री दत्ताच्या कारला भीषण अपघात, महाकाल मंदिरात दर्शनासाठी जाता झाले ब्रेक फेल, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 14:47 IST2022-05-03T14:45:32+5:302022-05-03T14:47:07+5:30
Tanushree Dutta's car Accident: अभिनेत्री मलायका अरोडानंतर अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारला अपघात झाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या कारला महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.

तनुश्री दत्ताच्या कारला भीषण अपघात, महाकाल मंदिरात दर्शनासाठी जाता झाले ब्रेक फेल, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट
भोपाळ - अभिनेत्री मलायका अरोडानंतर अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारला अपघात झाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या कारला महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत तिने या अपघाताची माहिती दिली आहे. तसेच या भयानक अनुभवाबाबत तनुश्रीने आपली भावना व्यक्त केली आहे. जीवनात आपल्यासोबत पहिल्यांदाच अशी दुर्घटना घडली आहे. कारचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे तिने सांगितले.
मात्र या अपघातानंतरही तनुश्री दत्ता ही महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. तिने मंदिरामधून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती अडखळत चालताना दिसत आहे. या अपघातात तिच्या पायाचा दुखापत झाली आहे. एवढंच नाही, तर जखमेमुळे तिला काही टाके घालावे लागले आहेत. मात्र सुदैवाने मोठा अपघात टळला.
महाकालाच्या दर्शनासाठी तनुश्री दत्ताने फोटोही शेअर केले. या पोस्टवर फॅन्स आणि त्यांचे निकटवर्तीय चिंता व्यक्त कराना दिसत आहेत. सर्वांनी तिची प्रकृती लवकर सुधरावी यासाठी प्रार्थना केली.