“मला काहीही झालं तर नाना पाटेकर जबाबदार...”, Tanushree Duttaने पुन्हा नानांवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 15:04 IST2022-07-29T15:03:09+5:302022-07-29T15:04:41+5:30
Tanushree Dutta: बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर मीटूचे आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर करत, नानांवर गंभीर आरोप केले आहेत.

“मला काहीही झालं तर नाना पाटेकर जबाबदार...”, Tanushree Duttaने पुन्हा नानांवर साधला निशाणा
बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर मीटूचे आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर करत, नानांवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पाटेकर व तनुश्री दत्ताचे ‘मीटू’ प्रकरण त्यावेळी प्रचंड गाजले होते. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. अर्थात नानांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. आता पुन्हा एकदा तनुश्रीने नानांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाली तनुश्री
मला काहीही झालं तर सांगून ठेवते की, त्याला मीटूचे आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील आणि सहकारी शिवाय त्यांचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार असतील. कोण आहेत बॉलिवूड माफिया?? तेच लोक ज्यांची नावं एसएसआर (सुशांत सिंग राजपूत) मृत्यू प्रकरणात वारंवार समोर आलीत. (सगळ्याचे वकील सारखेच आहेत, हे लक्षात घ्या.) अशा बॉलिवूड माफियांचे चित्रपट आपण पूर्णपणे बॅन केले पाहिजेत. त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार घातला पाहिजे. माझ्याविरोधात खोट्या बातम्या पेरणारे पत्रकार व पीआरही यात सहभागी आहेत. यांचे आयुष्क नरक बनवा कारण या सर्वांनी मला प्रचंड छळलं आहे. कायदा व न्यायाच्या लढाईत मी अपयशी ठरली असेल पण मला या महान देशाच्या लोकांवर विश्वास आहे. जयहिंद आणि अलविदा... पुन्हा भेटू, अशा आशयाची पोस्ट तनुश्रीने लिहिली आहे.
याआधीही तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर असेच गंभीर आरोप केले होते. नाना पाटेकर या माणसामुळे माझं अख्ख करिअर बर्बाद झालं, असं ती म्हणाली होती.
2008 साली तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला होता. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप करून तिने खळबळ उडवली होती. यानंतर तिने नानांविरोात तक्रारही दाखल केी होती. पण काहीही कारवाई झाली नाही. यानंतर अनेक वर्ष तनुश्री दत्ता इंडस्ट्रीतून गायब होती. 2018 मध्ये हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं होतं. नानांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले होते. हे प्रकर कोर्टातही गेलं होतं. 2019 साली पोलिसांनी नानांना क्लिनचीट दिली होती.