तन्मय भटचा विरोध, कपिल शर्माचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 18:35 IST2016-06-01T13:05:01+5:302016-06-01T18:35:01+5:30

चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी कॉमेडियन कपिल शर्माचे कौतुक केले. या शोमध्ये कोणालाही दुखावले जात नाही अथवा त्यांचा अनादर ...

Tanmay Bhat opposes, Kapil Sharma's appreciation | तन्मय भटचा विरोध, कपिल शर्माचे कौतुक

तन्मय भटचा विरोध, कपिल शर्माचे कौतुक

त्रपट निर्माते सुभाष घई यांनी कॉमेडियन कपिल शर्माचे कौतुक केले. या शोमध्ये कोणालाही दुखावले जात नाही अथवा त्यांचा अनादर केला जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एआयबीच्या शोमध्ये तन्मय भट्टच्या शो मध्ये सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सर्वत्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरेंच्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने देखील भट्टला धमकी दिली आहे. 
भारतामधील नागरिक नव्या कॉमेडीमुळे, जोक्समुळे दुखावले गेले आहेत. भावी पिढीसमोरील आदर्शाची मानहानी केली जात आहे. हे थांबणे आवश्यक आहे. कपिल शर्माचा शो हा अत्यंत लोकप्रिय आहे. यात कोणालाही दुखावले जात नाही किंवा कोणाचाही अनादर केला जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: Tanmay Bhat opposes, Kapil Sharma's appreciation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.