"जे होतं ते चांगल्यासाठीच...", उदय चोप्रासोबतच्या ब्रेकअपवर इतक्या वर्षांनी बोलली तनिषा मुखर्जी, म्हणाली- "तो आणि मी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:34 IST2025-09-09T11:33:38+5:302025-09-09T11:34:02+5:30
उदय चोप्रा आणि तनिषा काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता इतक्या वर्षांनी तनिषाने पहिल्यांदाच उदयसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

"जे होतं ते चांगल्यासाठीच...", उदय चोप्रासोबतच्या ब्रेकअपवर इतक्या वर्षांनी बोलली तनिषा मुखर्जी, म्हणाली- "तो आणि मी..."
काजोलची बहीण तनिषा मुखर्जीदेखील बॉलिवूडमधील अभिनेत्री आहे. तनिषाने काही सिनेमांमध्ये काम केलं. मात्र तिला काजोलसारखी लोकप्रियता मिळाली नाही. बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर घडवता आलं नसलं तरीही तनिषा तिच्या पर्सनल लाइफमुळे कायमच चर्चेत असायची. उदय चोप्रा आणि तनिषा काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता इतक्या वर्षांनी तनिषाने पहिल्यांदाच उदयसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे.
तनिषाने पिंकविलाला मुलाखत दिली. यात उदयसोबतच्या ब्रेकअपवर ती म्हणाली, "उदयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी आतून तुटले होते. कारण आमच्यात चांगली मैत्रीही होती. आम्ही एकमेकांना खूप काळापासून ओळखत होतो. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. मी नेहमी कोणत्याही गोष्टीची चांगली बाजू बघते. मी हाच विचार करते की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. सगळं काही चांगलंच होणार आहे. मी असाच विचार करते. ब्रेकअपमुळे नक्कीच तुम्ही दुखावले जाता. पण, हा आयुष्याचा भाग आहे. आणि तुम्ही यातून बाहेर पडता".
दरम्यान, तनिषाने सरकार, वन टू थ्री, टँगो चार्ली, सन ऑफ सरदार, मुन्ना मायकल, तुम मिलो तो सही अशा हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. नील निक्की या सिनेमात तनिषा आणि उदय चोप्रा एकत्र दिसले होते. याशिवाय तनिषाने बंगाली आणि काही साऊथ सिनेमांमध्येही काम केलं आहे.