कार अपघातात झाला अभिनेत्याचा मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 16:28 IST2019-10-29T16:28:22+5:302019-10-29T16:28:42+5:30

हा अभिनेता अनेक चित्रपट आणि रिॲलिटी शोचा भाग होता. त्याच्या मिमिक्रीने त्याने प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवले आहे.

Tamil actor Mano dies in car accident in Chennai on Diwali, wife critical | कार अपघातात झाला अभिनेत्याचा मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक

कार अपघातात झाला अभिनेत्याचा मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक

ठळक मुद्देमॅनो गाडी चालवत असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच मॅनोचे निधन झाले तर त्याच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे.

तमीळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट मॅनोचे कार अपघातात निधन झाले असून त्याचा अपघात 28 ऑक्टोबरला चेन्नईत झाला. अपघाताच्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील होती. मॅनो गाडी चालवत असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच मॅनोचे निधन झाले तर त्याच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे.

मॅनोच्या पत्नीला चेन्नईतील रामचंद्र रुग्णालयात दाखल केले असून तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेले आहे. तिची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मॅनोला सात वर्षांची मुलगी असून ती त्यावेळी त्यांच्यासोबत नव्हती.

मॅनोच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. पीआर जॉनने या अपघाताविषयी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, अतिशय चांगला अभिनेता मॅनोचा अवाडी या ठिकाणी अपघात झाला असून त्यात त्याचे निधन झाले आहे. त्याच्या पत्नीला रामचंद्र रुग्णालयात दाखल केले असून त्या आता आयसीयूमध्ये आहेत. ही बातमी ऐकून मला धक्काच बसला आहे.



 

मॅनोने पुझल या तमीळ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. छोट्या पडद्यावरील तो एक प्रसिद्ध सूत्रसंचालक होता. त्याने त्याच्या करियरची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती. त्याने अनेक रिॲलिटी शोत भाग घेतला होता आणि त्याच्या मिमिक्रीने लोकांना हसवले होते. तसेच तो एक खूप चांगला डान्सरदेखील होता. केवळ भारतातच नव्हे तर देशभर मॅनोने मिमिक्रीचे कार्यक्रम केले आहेत. 

Web Title: Tamil actor Mano dies in car accident in Chennai on Diwali, wife critical

टॅग्स :Accidentअपघात